esakal | त्याला वाटतं तो खूप मोठा क्रिकेटर आहे : हसिन जहाँ
sakal

बोलून बातमी शोधा

mohmmad shami's wife on the arrest warrant

कोलकत्त्याच्या एका न्यायालयानं शमीविरुद्ध अटक वॉरंट काढलं आहे. शमीची पत्नी हसिन जहाँ हीने त्याच्या विरोधात अटक वॉरंट जारी केलं होतं. 2018 मध्ये शमीविरुद्ध हसिनने घरगुती हिंसाचाराचा आरोप करत खटला दाखल केला होता.

त्याला वाटतं तो खूप मोठा क्रिकेटर आहे : हसिन जहाँ

sakal_logo
By
वृत्तसंस्था

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज महंम्मद शमीला भारतात परतल्यावर पोलिसांसमोर हजर राहावे लागण्याची शक्यता आहे. त्याला मायदेशी परतल्यावर अटक होऊ शकते. कोलकत्त्याच्या एका न्यायालयानं शमीविरुद्ध अटक वॉरंट काढलं आहे. शमीची पत्नी हसिन जहाँ हीने त्याच्या विरोधात अटक वॉरंट जारी केले होते. 2018 मध्ये शमीविरुद्ध हसिनने घरगुती हिंसाचाराचा आरोप करत खटला दाखल केला होता. शमी आणि त्याच्या भावाविरुद्ध कलम 498 ए अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर कोलकत्त्यातील न्यायालयाने शमीला पोलिसांसमोर हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. न्यायालयाच्या आदेशानुसार शमीला 15 दिवसांत पोलिसांसमोर हजर राहावं लागणार आहे. भारताचा वेस्ट इंडिज दौरा नुकताच संपला असून शमी 4 सप्टेंबरला भारतात परतणार आहे.

या सर्व प्रकरणावर त्याची पत्नी हसिन मात्र आनंदी असल्याचं दिसून येत आहे. यावर  एएनआयला आपली प्रतिक्रिया देत असताना ती म्हणाली, "मी न्यायालीन प्रणालीची आभारी आहे. एका वर्षापासून याचा संर्घष करत आहे. तुम्हाला सर्वांना कल्पना असेलच की, शमीला असं वाटतं तो खूप मोठा क्रिकेटर आहे त्यामुळे तो शक्तीशाली आहे". जर ममता बॅनर्जी या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री नसत्या तर माझं इथे राहणं ही अवघड झालं असतं. मला इथे सुरक्षित वाटतं. असंही मत तीने यावेळी व्यक्त केलं. पुढे ती म्हणाली,"अमरोहा पोलिसांनी मला आणि माझ्या मुलीला त्रास देण्याचा प्रयत्न करत होते. पण देवाचे आभार आहेत की त्यांचे प्रयत्न सफल झाले नाहीत. 

हसीन आणि शमीचा विवाह 2014 मध्ये झाला होता. त्यानंतर मागील वर्षी म्हणजेच 2018 मध्ये हसीन जहाँने महंम्मद शमीवर मारहाण केल्याचा, अन्याय आणि अत्याचार केल्याचा आरोप केला होता. तसेच हुंड्यासाठी पैसे मागितल्याचाही आरोप केला होता. हसीन जहाँने शमीचे फेसुबक आणि व्हॉट्स अॅप चॅटही प्रसारमाध्यमांसमोर आणले होते. शमीचे इतर महिलांसोबत अनैतिक संबंध आहेत असाही आरोप हसीनने केला होता. हसीन जहाँने फक्त शमीविरोधातच नाही तर त्याच्या कुटुंबीयांविरोधातही तक्रार दाखल केली होती. 

loading image
go to top