संघवाले अधिकारी हवेत - राहुल गांधी

पीटीआय
बुधवार, 23 मे 2018

"लोकसेवा आयोगाच्या यशस्वी उमेदवारांच्या यादीत फेरफार करून पंतप्रधानांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने निवडलेले अधिकारी नियुक्त करायचे आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी त्यांचे भविष्य धोक्‍यात घालणाऱ्या या संभाव्य बदलाविरोधात आवाज उठवावा,' असे आवाहन कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केले आहे. 
 

नवी दिल्ली - "लोकसेवा आयोगाच्या यशस्वी उमेदवारांच्या यादीत फेरफार करून पंतप्रधानांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने निवडलेले अधिकारी नियुक्त करायचे आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी त्यांचे भविष्य धोक्‍यात घालणाऱ्या या संभाव्य बदलाविरोधात आवाज उठवावा,' असे आवाहन कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केले आहे. 

लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यशस्वी झाल्यानंतर असणाऱ्या फाउंडेशन कोर्समध्ये उमेदवारांची कार्यक्षमता जोखून त्यानंतर त्यानुसार पदांचे आणि केडरचे वाटप करणे कितपत शक्‍य आहे, हे तपासून पाहण्याची शिफारस पंतप्रधान कार्यालयाने मनुष्यबळ विकास मंत्रालयाला केल्याचे समजते. यावरून राहुल यांनी सरकारवर ट्‌विटरद्वारे टीका करत विद्यार्थ्यांना आवाहन केले आहे. "विद्यार्थ्यांनो जागे व्हा, तुमचे भविष्य धोक्‍यात आले. नागरी सेवेमध्ये संघाच्या पसंतीचे अधिकारी नियुक्त करण्याचा पंतप्रधानांचा डाव आहे. यासाठी परीक्षेतील गुणांपेक्षा काही विशिष्ट गोष्टींमध्ये फेरफार करण्याचा त्यांचा विचार आहे,' असे गांधी यांनी म्हटले आहे. राहुल यांनी पंतप्रधान कार्यालयाने मंत्रालयाला पाठविलेल्या शिफारस पत्राची प्रतही प्रसिद्ध केली आहे. 

Web Title: he wants rss officers says rahul gandhi