मुख्याध्यापकासह विद्यार्थीनीवर 18 जणांचा बलात्कार

वृत्तसंस्था
शनिवार, 7 जुलै 2018

बिहारमध्ये एका विद्यार्थीनीवर 18 जणांनी सामुहिक बलात्कार केल्याची घटना घडली आहे. सारण येथील एका खासगी शाळेतील मुख्याध्यापक, दोन शिक्षक आणि 15 विद्यार्थ्यांनी मिळून एका विद्यार्थीनीवर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणात पोलिसांनी सहाजणांना अटक केली आहे. त्यामध्ये एका मुख्याध्यापकाचा आणि एका शिक्षकासह दोन विद्यार्थ्यांचा समावेश आहे. 

छपरा (बिहार) - बिहारमध्ये एका विद्यार्थीनीवर 18 जणांनी सामुहिक बलात्कार केल्याची घटना घडली आहे. सारण येथील एका खासगी शाळेतील मुख्याध्यापक, दोन शिक्षक आणि 15 विद्यार्थ्यांनी मिळून एका विद्यार्थीनीवर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणात पोलिसांनी सहाजणांना अटक केली आहे. त्यामध्ये एका मुख्याध्यापकाचा आणि एका शिक्षकासह दोन विद्यार्थ्यांचा समावेश आहे. 

इयत्ता दहावीत शिकत असलेल्या या विद्यार्थीनीवर डिसेंबर महिन्यापासून बलात्कार केला जात आहे. पिडितेचे वडील एका गुन्ह्यात तुरुंगात होते. ते तुरुंगातून बाहेर आल्यानंतर तिने सर्व प्रकार वडिलांना सांगितल्यावर त्यांनी पोलिसांत तक्रार दिली. त्यानंतर सारण पोलीस ठाण्यात शुक्रवारी (ता.06) 18 जणांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. डिसेंबरमध्ये काही विद्यार्थ्यांनी शाळेच्या टॉयलेटमध्ये सामूहिक बलात्कार करून त्याचा व्हिडिओ तयार केला. त्यानंतर हा व्हिडिओ दाखवून ब्लॅकमेल करत शाळेतच वारंवार बलात्कार केल्याचं पीडितीने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटलं आहे. 

सदर विद्यार्थीनीने हा संपूर्ण प्रकार शाळेच्या मुख्याध्यापकांना सांगितला होता. मात्र या मुख्याध्यापकाने या विद्यार्थ्यांवर कारवाई करायचं सोडून दोन शिक्षकांच्या मदतीने तिच्यावरच बलात्कार केला. या प्रकरणात एकूण 15 विद्यार्थ्यांसह 2 शिक्षक आणि एका मुख्याध्यापकाचा समावेश आहे.

Web Title: headmaster, two teachers and 15 students gangraped 10th class student in school primeses