कोरोना लस कधी येणार? आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी राज्यसभेत दिली माहिती

सकाळ ऑनलाईन टीम
Thursday, 17 September 2020

देशात सध्या कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत असताना देशाचे आरोग्यमंत्री हर्षवर्धन (Health Minister Dr Harsh Vardhan) यांनी कोरोनाबद्दलच्या लशीची महत्वाची माहिती दिली आहे. 

नवी दिल्ली: देशात सध्या कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत असताना देशाचे आरोग्यमंत्री हर्षवर्धन (Health Minister Dr Harsh Vardhan) यांनी कोरोनाबद्दलच्या लशीची महत्वाची माहिती दिली आहे. आरोग्यमंत्री हर्षवर्धन राज्यसभेत ( Rajya Sabha ) बोलत असताना म्हणाले की, कोरोनावरची लस भारतात लवकरच येणार आहे. सध्या भारत इतर देशांप्रमाणेच कोरोनावरील लशीवर (corona vaccine) काम करत आहे. पंतप्रधानांच्या मार्गदर्शनाखाली एक तज्ज्ञ गटाचं लसीवर लक्ष असून आम्ही त्याच्या योग्य नियोजनाकडे लक्ष देत आहोत. आम्हाला अशी आशा आहे की, पुढल्या वर्षाच्या सुरूवातीस भारतात कोरोनाची लस उपलब्ध होईल.'

पुढे बोलताना आरोग्यमंत्री हर्षवर्धन म्हणाले की, 'गेल्या काही महिन्यांपासून राज्य व केंद्र सरकार कोरोनाविरूद्ध लढा देत आहेत. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात संपूर्ण देश कोरोनाची लढाई लढत आहे. ज्यावेळेस 7 जानेवारीला डब्ल्यूएचओला (World Health Organisation) चीनमध्ये कोरोनाचा रुग्ण सापडल्याची माहिती मिळाली होती. आम्ही लगेच 8 जानेवारीपासून याबद्दलच्या बैठका सुरू केल्या होत्या. पंतप्रधान मोदींचं कोरोनासंदर्भातील प्रत्येक कृतीवर सलग 8 महिने लक्ष आहे याबद्दल इतिहास त्यांचं नेहमी स्मरण करेल. पंतप्रधान मोदींनी सगळ्यांचा सल्ला घेऊन काम केलं आहे.'

 corona updates: मागील 24 तासांत देशात कोरोनाचा कहर; उच्चांकी रुग्णवाढ

 

मागील दोन दिवसात भारतात कोरोनाचे रुग्ण कमी झाल्याचे दिसले होते. पण मागील 24 तासांत देशात कोरोनाच्या रुग्णांचा आकडा लाखाच्या जवळ गेला आहे. तसेच आतापर्यंत देशातील कोरोनाची बाधा झालेल्या रुग्णांचा आकडा 51 लाखांच्या वर गेला आहे. दिवसेंदिवस कोरोचा कहर भारतात वाढतानाच दिसत आहे. मागील 24 तासांत देशात कोरोनाचे 97 हजार 894 रुग्ण वाढले असून 1,132 नवीन कोरोनाच्या रुग्णांचं निदान झालं आहे. कालची कोरोनाचा आकडा धरुन देशातील कोरोनाची बाधा झालेल्यांचा आकडा 51 लाख 18 हजार 254 वर गेला आहे. सध्या देशात 10 लाख 9 हजार 976 कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत. दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत देशात 40 लाख 25 हजार 80 रुग्ण बरे झाले आहेत. तर आतापर्यंत देशात 83 हजार 198 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला असल्याची माहिती, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ( Ministry of Health & Family Welfare) दिली आहे.

 आंतराराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किंमती घसरल्या; भारतातही स्वस्त होऊ शकतं सोनं

बुधवारी एका भारतात दिवसात 11 लाख 36 हजार 613 कोरोना चाचण्या घेण्यात आल्या आहेत. तर आतापर्यंत देशात 6 कोटी 5 लाख 65 हजार 728 कोरोनाच्या चाचण्या घेण्यात आल्या आहेत, अशी माहिती भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदने  ( Indian Council of Medical Research) दिली आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Health Minister HarshVardhan informed the Rajya Sabha about the corona vaccine