माजी मुख्यमंत्र्यांसाठीच्या बंगल्यांवर होणार सुनावणी 

वृत्तसंस्था
रविवार, 3 जून 2018

माजी मुख्यमंत्र्यांना मोफत घरे आणि अन्य सुविधा देण्याच्या कायद्यातील तरतुदीला आव्हान देणाऱ्या याचिकेवर राजस्थान उच्च न्यायालयात 12 जुलै रोजी सुनावणी होणार आहे.

जयपूर : माजी मुख्यमंत्र्यांना मोफत घरे आणि अन्य सुविधा देण्याच्या कायद्यातील तरतुदीला आव्हान देणाऱ्या याचिकेवर राजस्थान उच्च न्यायालयात 12 जुलै रोजी सुनावणी होणार आहे.

गेल्या महिन्यात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्र्यांनी लखनौमधील त्यांचे बंगले खाली करण्यास सुरवात केल्यानंतर ही घडामोड घडली आहे. या संबंधीचे विधेयक गेल्या वर्षी एप्रिलमध्ये विधानसभेत आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आले होते. राजस्थान मंत्र्यांच्या वेतन कायद्यात ही नवीन तरतूद करण्यात आली होती. 

Web Title: Hearing on former chief ministers' bungalows