महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्‍नी आज सुनावणी

वृत्तसंस्था
सोमवार, 23 जानेवारी 2017

नवी दिल्ली / बेळगाव : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्‍नी सर्वोच्च न्यायालयात सोमवारी (ता. 23) महत्त्वाची सुनावणी होणार आहे. या सुनावणीत साक्षी, पुराव्यांचे सादरीकरण होण्याची शक्‍यता आहे. सीमाप्रश्‍न निर्णायक वळणावर आल्यामुळे न्यायालयीन कामकाजाला गती आली आहे.

याआधी 11 जुलै रोजी सीमाप्रश्‍नी सुनावणी होणार होती; परंतु त्रिसदस्यीय खंडपीठापैकी एक सदस्य अनुपस्थित राहिल्यामुळे सुनावणी पुढे ढकलली होती. या प्रकरणी साक्षी, पुरावे नोंदविण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने जम्मू-काश्‍मीर उच्च न्यायालयाचे निवृत्त मुख्य न्यायमूर्ती मनमोहन सरीन यांची नियुक्‍ती केली आहे. त्यांच्याकडे महाराष्ट्राने साक्षीदारांची नावे आणि पुरावे सादर केले आहेत.

महाराष्ट्राच्या बाजूने ज्येष्ठ विधिज्ज्ञ हरीश साळवे यांनी युक्‍तिवाद करावा, यासाठी गेल्या तीन महिन्यांपासून महाराष्ट्र एकीकरण समितीने पाठपुरावा केला आहे. त्यामुळे उद्याच्या सुनावणीत ऍड. साळवे युक्‍तिवाद करणार का, याबाबत औत्सुक्‍य आहे. याशिवाय महाराष्ट्राने अन्य तीन वरिष्ठ वकिलांच्या पॅनेलची नियुक्‍ती केली आहे. कर्नाटकच्या बाजूने माजी केंद्रीय मंत्री, ज्येष्ठ विधिज्ज्ञ कपिल सिब्बल युक्‍तिवाद करण्याची शक्‍यता आहे.

Web Title: hearing on maharashtra karnataka border dispute