राम जन्मभूमीची सुनावणी पुन्हा सुरू; 17 ऑक्टोबरला होणार अंतिम सुनावणी

वृत्तसंस्था
सोमवार, 14 ऑक्टोबर 2019

जिल्हाधिकारी अनुज झा यांनी आयोध्येत सुनावणीपूर्वीच कलम 144 लागू करण्यात आला होता. तसेत येथे सुरक्षा व्यवस्थाही वाढवण्यात आली आहे. पुढील दोन महिन्यांपर्यंत आयोध्येत 144 कलम लागू असेल. 

नवी दिल्ली : राम जन्मभूमीची सुनावणी अंतिम टप्प्यात पोहोचली असून 17 ऑक्टोबरला या बहुचर्चित प्रकरणाची अंतिम सुनावणी हेईल व नोव्हेंबरमध्ये याचा निकाल लागण्याची शक्यता आहे. पण यापूर्वीच आयोध्यात 144 कलम म्हणजेच जमावबंदी लागू करण्यात आली आहे. दसऱ्यानिमित्त आठ दिवसांच्या सुटीनंतर आजपासून पुन्हा एकदा या सुनावणीला पुन्हा सुरवात झाली आहे.

सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी आयोध्याच्या खटल्याप्रकरणी 17 ऑक्टोबरपर्यंत युक्तिवाद पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे या प्रकरणाचा अंतिम निकाल नोव्हेंबरपर्यंत येईल अशी शक्यता आहे. गोगोई हे 17 नोव्हेंबरमध्ये निवृत्त होणार असून त्यांच्या निवृत्तीपूर्वीच हा निकाल लागेल. 

 ranjan gogoi

जिल्हाधिकारी अनुज झा यांनी आयोध्येत सुनावणीपूर्वीच कलम 144 लागू करण्यात आला होता. तसेत येथे सुरक्षा व्यवस्थाही वाढवण्यात आली आहे. पुढील दोन महिन्यांपर्यंत आयोध्येत 144 कलम लागू असेल. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hearing Of Ram Janmabhoomi and Babri Masjid Land Dispute starts from Today