पुनर्विचार याचिकेवर आज सुनावणी 

पीटीआय
मंगळवार, 23 ऑक्टोबर 2018

नवी दिल्ली (पीटीआय) : शबरीमला मंदिरात सर्व वयोगटातील महिलांना प्रवेश देण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने फेरविचार करावा, अशी मागणी करणाऱ्या याचिकेवर सुनावणी कधी करायची, यावर सर्वोच्च न्यायालय उद्या निर्णय घेणार आहे. 

नवी दिल्ली (पीटीआय) : शबरीमला मंदिरात सर्व वयोगटातील महिलांना प्रवेश देण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने फेरविचार करावा, अशी मागणी करणाऱ्या याचिकेवर सुनावणी कधी करायची, यावर सर्वोच्च न्यायालय उद्या निर्णय घेणार आहे. 

सर्वोच्च न्यायालयात शबरीमला मंदिर प्रवेशसंदर्भात 19 पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. शबरीमला मंदिरप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने सर्व वयोगटातील महिलांना प्रवेश देण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्यानंतर सुरू झालेला वाद अद्याप शमलेला नाही. राज्यभरात या निर्णयाच्या विरोधात आंदोलन सुरू आहे. मंदिराचे दरवाजे उघडल्यानंतर आंदोलन अधिक तीव्र झाले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतरही दोन पत्रकारांसह आतापर्यंत नऊ महिलांनी मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. मात्र, एकही महिला मंदिरात प्रवेश करण्यात यशस्वी ठरली नाही. यादरम्यान शबरीमला येथे भगवान अयप्पा मंदिराचे दरवाजे सोमवारपासून एक महिन्यासाठी बंद होत आहेत. अशा स्थितीत सर्वोच्च न्यायालय लवकरच मंदिरसंदर्भात सुनावणी करू शकते. 
बंदोबस्तात वाढ 

पांबा (केरळ) : शबरीमला मंदिर परिसरात जमावबंदी कायदा लागू असूनही पांबा, निलाकल, इलाव्यूमकल येथे शेकडो अयप्पा भाविकांनी 12 महिलांना मंदिरात जाण्यापासून रोखले. 17 ऑक्‍टोबरपासून मंदिराचे दरवाजे उघडल्यानंतर भाविकांनी आंदोलन सुरू केले आहे. 

Web Title: Hearing on the rethink petition today