सलमानवरील खटल्याची 6 जुलै रोजी सुनावणी

वृत्तसंस्था
शुक्रवार, 21 एप्रिल 2017

जोधपूर: अभिनेता सलमान खान याची शस्त्रास्त्र कायद्याचा भंग केल्याच्या गुन्ह्यातून न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. याला राजस्थान सरकारने सत्र न्यायालयात आव्हान दिले असून, या खटल्याची सुनावणी 6 जुलैपासून सुरू होणार आहे.

परवान्याची मुदत संपल्यानंतरही शस्त्र बाळगल्या व त्याचा वापर केल्याचा गुन्हा सलमानवर होता. कनिष्ठ न्यायालयाने या प्रकरणात त्याची निर्दोष मुक्तता केली होती. त्याला आव्हान देणारी याचिका राजस्थान सरकारने सत्र न्यायालयात दाखल केली होती. सत्र न्यायाधीश भगवानदास आगरवाल यांनी 7 मार्च रोजी बजावलेल्या नोटिशीनुसार सलमानच्या वकिलांनी शुक्रवारी न्यायालयात उपस्थित राहून वकिलतनामा सादर केला. या प्रकरणी 6 जुलै रोजी सुनावणी घेण्याचा आदेश न्यायालयाने दिला.

Web Title: Hearing on Salman's case on July 6