शाहीनबाग आंदोलनावर सोमवारी होणार सुनावणी

पीटीआय
शनिवार, 8 फेब्रुवारी 2020

दिल्लीतील शाहीनबागेत सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात सुरू असलेल्या आंदोलनास आक्षेप घेणाऱ्या याचिकांवर पुढील आठवड्यात सुनावणी घेण्यात येईल, असे आज सर्वोच्च न्यायालयाने जाहीर केले. आता या मुद्द्यावर सुनावणी घेऊन आम्हाला विधानसभा निवडणुकीवर कसलाही प्रभाव टाकायचा नसल्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले. दिल्ली विधानसभेसाठी उद्या (ता. ८) मतदान होणार असून, या प्रकरणाची सुनावणी मात्र सोमवारी होईल.

नवी दिल्ली - दिल्लीतील शाहीनबागेत सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात सुरू असलेल्या आंदोलनास आक्षेप घेणाऱ्या याचिकांवर पुढील आठवड्यात सुनावणी घेण्यात येईल, असे आज सर्वोच्च न्यायालयाने जाहीर केले. आता या मुद्द्यावर सुनावणी घेऊन आम्हाला विधानसभा निवडणुकीवर कसलाही प्रभाव टाकायचा नसल्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले. दिल्ली विधानसभेसाठी उद्या (ता. ८) मतदान होणार असून, या प्रकरणाची सुनावणी मात्र सोमवारी होईल.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

‘आम्हाला समस्या समजली असून, त्याचे कशा पद्धतीने निराकरण करायचे. याचाही गांभीर्याने विचार करावा लागेल. आम्ही या मुद्द्यावर सोमवारी सुनावणी घेऊ. खरेतर तेव्हाच सुनावणी घेणे योग्य ठरेल,’’ असे न्या. एस. के. कौल आणि न्या. के. एम. जोसेफ यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने स्पष्ट केले. याच प्रकरणातील याचिकाकर्त्याच्या एका वकिलानेच दिल्लीतील निवडणूक ही उद्या असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. त्यावर न्यायालयानेही त्यामुळेच आम्ही तुम्हाला सोमवारी यायला सांगितले असून, आम्ही निवडणुकीवर प्रभाव का टाकावा, असा थेट सवाल केला.

Coronavirus : कोरोनामुळे मिरची उत्पादक हैराण!

या प्रकरणातील सर्वच याचिकाकर्त्यांनी सोमवारी युक्तिवाद करण्यासाठी पूर्ण तयारीनिशी यावे, हे प्रकरण पुन्हा दिल्ली उच्च न्यायालयाकडे माघारी का पाठविण्यात येऊ नये, हे स्पष्ट करावे, असेही न्यायाधीशांनी नमूद केले. तसे पाहता या प्रकरणावर उच्च न्यायालयानेच सुनावणी घेणे योग्य ठरले असते, असा पुनरुच्चारही सर्वोच्च न्यायालयाने केला. या प्रकरणी ज्येष्ठ विधिज्ञ अमित सहानी यांच्याप्रमाणेच माजी आमदार नंदकिशोर गर्ग यांनी न्यायालयामध्ये धाव घेत शाहीनबागेतील आंदोलनामुळे वाहतुकीमध्ये व्यत्यय येत असल्याचे म्हटले होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hearing on Shaheenbagh agitation on Monday