नोटाबंदीबाबतची सुनावणी दोन डिसेंबरला होणार

वृत्तसंस्था
शुक्रवार, 25 नोव्हेंबर 2016

नवी दिल्ली- नोटाबंदी निर्णयाच्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणाऱ्या सर्व याचिकांवर येत्या दोन डिसेंबरला सुनावणी होणार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले आहे.

सरन्यायाधीश टी. एस. ठाकूर आणि न्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांच्या खंडपीठाने आम्ही लोकांना होणारा त्रास आणि घटनात्मक वैधता या दोन्ही मुद्द्यांचा विचार करणार असल्याचे म्हटले आहे. येत्या शुक्रवारी म्हणजेच दोन डिसेंबरला दुपारी दोन वाजता ही सुनावणी होईल. दरम्यान, खंडपीठाने ऍटर्नी जनरल मुकुल रोहतगी यांना केंद्राची बाजू मांडण्यास सांगितले आहे.

Web Title: The hearing will be held on December two.