पाकिस्तानच्या गोळीबारात बीएसएफचा जवान हुतात्मा

वृत्तसंस्था
सोमवार, 21 नोव्हेंबर 2016

श्रीनगर - जम्मू काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यात रविवारी रात्री पाकिस्तानी सैन्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन करत सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) चौक्यांवर केलेल्या गोळीबारात एक जवान हुतात्मा झाला असून, तीन जवान जखमी आहेत. 

बीएसएफच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, राजौरी जिल्ह्यातील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील (एलओसी) चौक्यांवर पाकिस्तानी सैन्याकडून जोरदार गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात राय सिंह हे हेड कॉन्स्टेबल गंभीर जखमी झाले होते. त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या गोळीबारात अन्य तीन जवानही जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

गेल्या 24 तासात पाकिस्तानकडून तीनवेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले आहे. बीएसएफच्या जवानांनीही पाकिस्तानच्या गोळीबाराला चोख प्रत्यूत्तर दिले. पाकव्याप्त काश्मीरमध्ये भारतीय सैन्याकडून करण्यात आलेल्या सर्जिकल स्ट्राईकनंतर पाकिस्तानकडून 286 वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले आहे.

Web Title: heavy firing from the pakistani side one army jawan killed in Rajouri sector