गोव्यात धुवाधार पाऊस 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 20 जून 2018

गोवा : राज्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाने जोर धरला आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे मोठमोठी झाडे मोडून तसेच उन्मळून पडण्याचे प्रकार घडत आहेत. काही झाडे रस्त्यावर पडल्याने वाहतुकीची कोंडी होत आहे.

गोवा : राज्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाने जोर धरला आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे मोठमोठी झाडे मोडून तसेच उन्मळून पडण्याचे प्रकार घडत आहेत. काही झाडे रस्त्यावर पडल्याने वाहतुकीची कोंडी होत आहे.

अग्निशमन दलाच्या जवानांची रस्त्यावर पडलेली झाडे तसेच घरावर पडलेली झाडे बाजूला करताना तारांबळ उडत आहे. सकाळी शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना वेळेवर पोहचण्यास उशीर होण्याच्या घटना घडत आहे. जोरदार पडणाऱ्या पावसाच्या सरींमुळे पाणी साचून रस्त्यावरील तसेच पदपथावरील गटारांच्या टाक्या पाण्याने भरल्या असून त्यातून सांडपाणी घाण पाणी वाहत असल्याने दुर्गंधी पसरली आहे. या रस्त्यावरून पादचारी जात असल्याने आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.

Web Title: heavy rain in goa