हिमालयाच्या कुशीतील राज्यात मुसळधार पाऊस

शिमला - मुसळधार पाऊस आणि दरडी कोसळल्यामुळे हिमाचल प्रदेशातील मनाली ते कुलू यांना जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 3चे मोठे नुकसान झाले आहे. या मार्गावरील जड वाहनांची वाहतूक बंद करण्यात आली आहे.
शिमला - मुसळधार पाऊस आणि दरडी कोसळल्यामुळे हिमाचल प्रदेशातील मनाली ते कुलू यांना जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 3चे मोठे नुकसान झाले आहे. या मार्गावरील जड वाहनांची वाहतूक बंद करण्यात आली आहे.

उत्तर काशीत ढगफुटी; हिमाचलमध्ये 18 जण मृत्युमुखी
सिमला / धर्मशाला - उत्तर भारतात विशेषत: हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या राज्यात मुसळधार पाऊस सुरू असल्याने जनजीवन विस्कळित झाले आहे. हिमाचलमध्ये पावसामुळे विविध दुर्घटनेत गेल्या चोवीस तासांत 18 जण मृत्युमुखी पडले असून, नऊ जण जखमी झाले आहेत. हिमाचलच्या अनेक जिल्ह्यांत पूर आल्याने असंख्य गावांचा संपर्क तुटला आहे. दरड कोसळणे आणि भूस्खलनामुळे 323 रस्ते आणि राष्ट्रीय महामार्ग 5 वरील वाहतूक बंद करण्यात आली आहे.

हिमाचलशिवाय उत्तराखंड, राजस्थान, पंजाबच्या अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

हिमाचलमध्ये विविध कारणांमुळे 18 जणांचा मृत्यू झाला आणि नऊ जण जखमी झाले आहेत. सिमला येथे 8, कुल्लू आणि सिरमौर, सोलन आणि चंबा येथे प्रत्येकी दोन आणि उना व लाहोल स्पिटी जिल्ह्यात प्रत्येकी एक जण मृत्युमुखी पडले आहेत. सिमल्याजवळ आरटीओ कार्यालयाजवळ भूस्खलनच्या घटनेत तीन जणांचा मृत्यू झाला.

याशिवाय अन्य एका घटनेत एका व्यक्तीचा ढिगाऱ्याखाली दबून मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. तसेच भिंत कोसळून एका मजुराचा मृत्यू झाला. याशिवाय कुल्लु जिल्ह्यात रोहरू येथे भूस्खलनामुळे एकाचा मृत्यू झाला. पावसामुळे झाड कोसळून 2 नेपाळी नागरिकांचा मृत्यू झाला.

त्याचवेळी चंबा येथे पुरात एक जण वाहून गेला. विविध घटनांमुळे राज्यातील 323 रस्ते बंद करण्यात आले आहेत. धर्मशाला येथे 114 मिलिमीटर, डलहौसी आणि चंबा येथे 73 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. लाहौल स्पिटी जिल्ह्यात मनालीकडे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर कोकसर येथे पुलाची हानी झाल्याने वाहतूक थांबविली आहे. याशिवाय मनाली-लेह मार्गावर भूस्खलन झाल्याने वाहतूक विस्कळित झाली आहे.

उत्तरकाशीत ढगफुटी; पाच बेपत्ता
हिमाचल प्रदेशव्यतिरिक्त उत्तराखंडमध्ये ढगफुटीमुळे अनेक गावात पूरस्थिती निर्माण झाली आहे. अनेक नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. उत्तरकाशीत पावसामुळे घरांची पडझड झाली आहे. पाणी पातळी वाढल्याने एसडीआरएफ, रेड क्रॉस, आयटीबीपी आणि एनडीआरएफचे पथके तैनात केली आहेत. पुरात अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मोरी तहसीलअंतर्गत ढगफुटी झाल्याने टोन्स नदीला पूर आला आहे. तसेच वीस घरे वाहून गेली आहेत. पावसामुळे पाच जण बेपत्ता झाले.

पंजाबमध्ये छत कोसळून तीन ठार
पंजाबमध्ये अनेक भागात पाऊस सुरू असल्याने नद्या दुथडी भरून वाहत आहेत. पंजाबच्या खन्ना शहरातील ओल गावात घराचे छत कोसळून एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला. सुरजित सिंग, त्यांची पत्नी बालजिंदर कौर आणि मुलगा गुरप्रित सिंग अशी मृतांची नावे आहेत. सुदैवाने दहा वर्षांची मुलगी या दुर्घटनेतून बचावली. दरम्यान, गुरुदासपूर जिल्ह्यात बियास नदीला आलेल्या पुरातून सुमारे 11 जणांना वाचविण्यात यश आले. बियास नदीच्या काठावर असलेले चाचैन शोरियान गावातील नागरिक वाहून गेल्याची माहिती प्रशासनाला मिळाली. त्यानुसार मोहीम राबवत अकरा जणांना सुरक्षितपणे बाहेर काढऱ्यात आले. रावी आणि बियास नदीला सध्या पूर आला असून सखल भागात जाणे नागरिकांनी टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com