केरळमध्ये पावसाचे 29 बळी, 54 हजार नागरिक बेघर

वृत्तसंस्था
शनिवार, 11 ऑगस्ट 2018

इडुक्की जिल्ह्यासह इतर जिल्ह्यांना धोक्याचा इशारा देण्यात आला असून, इडुक्की धरणातून पाणी सोडले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. रस्ते, महामार्ग हे खचले असून अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. एनडीआरएफच्या दहा तुकड्या मदतकार्य करत आहेत. लष्कराने अडकून पडलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी पूल बांधले आहेत.

तिरूअनंतपुरम : गेल्या तीन-चार दिवस मुसळधार पावसामुळे केरळ राज्यातील काही जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. काल (ता. 10) राज्यात तिसरा रेड अलर्ट जारी करण्यात आला होता. या मुसळधार पावसामुळे 29 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे, तर 54,000 नागरिक बेघर झाले आहेत. 

इडुक्की जिल्ह्यासह इतर जिल्ह्यांना धोक्याचा इशारा देण्यात आला असून, इडुक्की धरणातून पाणी सोडले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. रस्ते, महामार्ग हे खचले असून अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. एनडीआरएफच्या दहा तुकड्या मदतकार्य करत आहेत. लष्कराने अडकून पडलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी पूल बांधले आहेत.  

पेरियार नदीची पातळी वाढली असून वेलिंग्टन बेटे, कोची बॅकवॉटरचा काही भाग हा पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. इडुक्की भागात जिल्हा प्रशासनाने पर्यटकांना डोंगराळ भागात जाण्यापासून रोखल्याचे समजते. मुन्नार येथे तीस पर्यटक अडकले असून, त्यात परदेशी पर्यटकांचाही समावेश आहे. त्यांना बाहेर काढण्यासाठी लष्कराचे प्रयत्न चालू आहेत.  

Web Title: heavy rain in kerala 29 died 54 thousand citizens homeless