केरळमध्ये धुवाधार पाऊस; तिसरा रेड अलर्ट जारी

वृत्तसंस्था
शुक्रवार, 10 ऑगस्ट 2018

तिसऱ्या रेड अलर्टमुळे लष्कर नौदल व एअर फोर्सला सज्ज राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, तर एनडीआरएफच्या दहा तुकड्या मदतकार्य करत आहेत.

तिरूअनंतपुरम : केरळ राज्यात पावसाचा जोर वाढला असून या मुसळधार पावसामुळे 27 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे केरळमध्ये तिसरा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. राज्यातील पलक्कड, इडुक्की, वायनाड यासह इतर जिल्ह्यांना पावसाचा तडाखा बसला असून पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. वायनाड, मालाप्पूरम आणि इडुक्कीमध्ये काही ठिकाणी दरडही कोसळली आहे.

इडुक्कीमधील चीरुथोनी धरणाचे तीन दरवाजे हे सतत वाढत जाणाऱ्या पाण्याच्या पातळीमुळे उघडण्यात आले आहेत. पूरस्थितीमुळे एर्नाकुलम जिल्ह्यात 57 मदत छावण्या उभारण्यात आल्या आहेत, तर या छावण्यांमध्ये 1076 कुटूंबांना हलविण्यात आले आहे. 

तिसऱ्या रेड अलर्टमुळे लष्कर नौदल व हवाई दलाला सज्ज राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, तर एनडीआरएफच्या दहा तुकड्या मदतकार्य करत आहेत. 50 वर्षात केरळात पहिल्यांदाच असा मुसळधार पाऊस पडल्याचे केंद्रीय मंत्री के. जे. अल्फोन्स यांनी सांगितले. 

Web Title: heavy rain in kerala order to ready army air force navy in kerala