पुन्हा मुसळधार पाऊस; रस्त्यांवर पाणीच पाणी...

वृत्तसंस्था
रविवार, 1 डिसेंबर 2019

- मुसळधार पाऊस. विजांचा गडगडाट.

चेन्नई : महाराष्ट्रातील मुसळधार पावसानंतर आता मुक्काम तमिळनाडूमध्ये सुरु झाला आहे. रस्त्यांवर पाणीच पाणी झाले आहे. याशिवाय काही घरांमध्येही पाणी शिरले आहे. या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. तसेच हवामान विभागाकडून राज्यात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. 

डाऊनलोड करा ई-सकाळचे एप

महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये ऑक्टोबरअखेरपर्यंत मुसळधार पाऊस बरसत होता. या पावसाचा महाराष्ट्रातील मुक्काम गेल्या काही दिवसांपूर्वी थांबला आहे. त्यानंतर या मुसळधार पावसाचा फटका तमिळनाडूतील जनतेला बसला आहे. अनेक भागांत पाणीच पाणी झाले आहे. काल रात्रीपासून बरणारा पाऊस आता काही प्रमाणात कमी झाला आहे.

Image may contain: one or more people and outdoor

काल रात्री दहाच्या सुमारास स्थानिक हवामान विभागाने एक बुलेटिन जारी केले होते. या बुलेटिनमध्ये दिलेल्या अंदाजानुसार राज्यात मुसळधार पाऊस बरसण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. कोस्टल भाग, तमिळनाडू, पुद्दुचेरी आणि केरालकालमध्ये 1 डिसेंबरला पाऊस होईल, असा अंदाज व्यक्त केला आहे. 

Image may contain: one or more people and outdoor

धक्कादायक : चक्क हेल्मेट घालून कांदा विक्री; कांद्यासाठी आधारकार्ड तारण

दरम्यान, या मुसळधार पाऊस आणि विजांच्या गडगडाटाचा फटका तमिळनाडूतील पश्चिम भागातील निलगीरी, कोईंबतूर, थिरूप्पुर आणि इरोड जिल्ह्याला बसणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला होता. त्यानुसार काल रात्रीपासून या भागात मुसळधार पाऊस बरसत आहे. 

Image may contain: 3 people, people standing and outdoor


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Heavy Rainfall in Tamil Nadu