तमिळनाडूमध्ये उच्चांकी पाऊस;पावसाने शंभर वर्षांचा उच्चांक मोडीत काढला

tamilnadu heavy rain
tamilnadu heavy rain

चेन्नई - चेन्नई आणि उपनगरे तसेच नजीकच्या काही जिल्ह्यांत डिसेंबर- जानेवारीमध्ये पडलेल्या पावसाने यंदा शंभर वर्षांचा विक्रम मोडीत काढल्याची बाब उघड झाली आहे. सर्वसाधारणपणे मारगाझी या तमिळ महिन्यामध्ये राज्यात पाऊस पडतो तेव्हा सर्वत्र थंडीचे वातावरण असते. 

यंदा मात्र पावसाने शंभर वर्षांचा उच्चांक मोडीत काढला आहे. राज्यामध्ये १९१५ नंतर प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणावर पाऊस पडल्याचे सूत्रांनी सांगितले. जानेवारी महिन्यामध्ये तमिळनाडूत एवढा जोरदार पाऊस पडण्याची ही दुसरी वेळ आहे. राज्यात सध्या पोंगलच्या तयारीला वेग आला असून शेतकरी पिके काढण्यात व्यग्र असतानाच पावसाने फटका दिला.

पंजाब, हरियानात पाऊस सुरूच 
पंजाब, हरियानातही पावसाने हजेरी लावली. गेल्या २४ तासांत चंदिगड (३ मि.मी.), अंबाला (८ मि.मी.), हिस्सार (७.६ मि.मी.), कर्नाल (२५ मि.मी.) पावसाची नोंद झाली. पावसानंतर तापमानात मात्र सरासरीपेक्षा वाढ झाली. चंडीगडमध्ये १३.६ अंश किमान तापमान नोंदविले गेले. ते सरासरीपेक्षा आठ अंशांनी जास्त होते.

दिल्लीत गारपीट
दिल्लीकरांची बुधवारची सकाळ ढगांचा गडगडाट व छतावर पडणाऱ्या गारांच्या आवाजाने झाली. राजधानीत सलग चौथ्या दिवशी पावसाची हजेरी कायम होती. दक्षिण दिल्लीच्या काही भागात गारपीट झाल्याची माहिती हवामान खात्याने दिली. काळ्याकुट्ट ढगांमुळे दृश्यमानता कमी झाली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com