बर्फवृष्टीमुळे शिमल्यात वाहतूक विस्कळीत

वृत्तसंस्था
शुक्रवार, 10 मार्च 2017

हिमाचल प्रदेशात येत्या 24 ते 48 तासात जोरदार बर्फवृष्टी होऊ शकते असे भाकित हवामान विभागाने वर्तवले आहे.

शिमला- हिमाचल प्रदेशातील शिमला तसेच इतर पर्यटकांचे आकर्षण असणाऱ्या ठिकाणी आज (शुक्रवारी) सकाळी जोरदार बर्फवृष्टी झाल्याने येथील वाहतूक विस्कळीत झाली.

हिमाचलमध्ये ठिकठिकाणी बर्फवृष्टी झाल्याने तापमान अचानक घटले आहे. शिमला येथे 4 सेमी, कुफरी येथे 7 सेमी, नारकंडा येथे 5 सेमी, आणि खडापत्थर येथे 20 सेमी इतक्या बर्फवृष्टीची नोंद झाली. या बर्फवृष्टीमुळे कुफरी जवळील शिमला-किन्नूर महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली तसेच खारपठार जवळील शिमला-रोहरू मार्गही बंद करण्यात आला.

शिमल्याचे पोलिस अधीक्षक यांनी सांगितले की, या बर्फवृष्टीमुळे रस्ते बंद करण्यात आले आहेत, तसेच शाळांनाही सुट्टी देण्यात आली आहे.
हिमाचल प्रदेशात येत्या 24 ते 48 तासात जोरदार बर्फवृष्टी होऊ शकते असे भाकित हवामान विभागाने वर्तवले आहे.
 

Web Title: heavy snowfall in shimla disrupts transportation