'दीपस्तंभ'च्या यजुर्वेंद्र महाजन यांना हेलन केलर राष्ट्रीय पुरस्कार प्रदान

mahajan
mahajan

नवी दिल्ली : जळगावमध्ये दिव्यांग युवक-युवतींसाठी मोफत निवासी, स्पर्धा परीक्षा, स्वयंरोजगार, मार्गदर्शन केंद्र चालवून त्यांना जगण्याचे बळ देणारे, स्वत:च्या पायावर उभे करणारे यजुर्वेंद महाजन यांना यंदाचा 'राष्ट्रीय हेलन केअर' हा मानाचा पुरस्कार केंद्रीय राज्यमंत्री डॉ. सत्यपाल सिंह यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. दिव्यांगांना कुणाच्या उपकाराची गरज नसते, त्यांना केवळ संधी व सोयी-सुविधांची आवश्यकता असते. त्या उपलब्ध झाल्यास दिव्यांग मोठे कार्य करतात, अशा विश्वास डॉ. सिंह यांनी व्यक्त केला. 

बाहेर पडण्यासाठी, ट्रेनमध्ये चढण्यासाठी, शाळेत, प्रवासादरम्यान, ट्रायसिकल, व्हीलचेअर मिळवण्यासाठी आजही अनेकांना संघर्ष करावा लागतो. अशा प्रतिकुल परिस्थितीतही पराजय न स्विकारता जे जिद्दीने समोर येत आहे ते खरे रोल मॉडल आहेत. अशा रोल मॉडल्स ला प्रोत्साहन देण्याची जबाबदारी आपल्यावर असल्याची भावना पुरस्कार प्राप्त नवउद्योजक दविंदर सिंह यांनी व्यक्त केली. उद्योजकांनी दिव्यांगांना रोजगारायच्या संधी देण्याचे आवाहन त्यांनी केले.  

‘साईन लँग्वेज’च्या माध्यमातून एकामेकांसोबत व्यक्त होणारे दिव्यांगजन श्रोते, दिव्यांगासाठी काम करणाऱ्या सेवाभावी संस्थेंच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत ‘नॅशनल सेंटर फॉर प्रमोशन ऑफ एम्प्लायमेंट फॉर डिसेबल्ड पीपल’ (एनसीपीईडीपी) संस्थेचा हा पुरस्कार राष्ट्रीय पुरस्कार सोहळा पार पडला. एकूण ३ श्रेणीत पुरस्कार देण्यात आले. 

रविवारी सकाळी दिल्ली येथील इंडिया इंटरनॅशनल सेंटरमध्ये आयोजित या सोहळ्यात देशातील विविध भागातून आलेल्या दिव्यांग जणांनी सहभाग घेतला. यजुर्वेंद्र महाजन यांच्या  मनोबल केंद्राच्या माध्यमातून शंभराहून अधिक गरीब, दलित, आदिवासी, वंचित, शोषीत, कुटुंबातील दिव्यांग तरुण-तरुणी मोफत निवासी प्रशिक्षण घेत आहेत.  मनोबलच्या अनेक विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धा परीक्षांमद्धे यश संपादन केले आहे.  

दिव्यांगांना रोजगार देणाऱ्या संस्था या गटात महाजन यांना हा  सन्मान देण्यात आला निवृत्त सनदी अधिकारी सौरभ चंद्रा, मार्इंडट्री चे अब्राम मोसेस, अनुप श्रीवास्तव तसेच गीता दंग यांच्या निवड समितीने पुरस्कारप्राप्त विजेत्यांची निवड केली. विशेष म्हणजे यंदा सर्वाधिक नामांकन प्राप्त झाले होते अशी माहिती कार्यक्रमाच्या प्रास्ताविका दरम्यान एनसीपीईडीपी चे कार्यकारी संचालक अरमान अली यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com