मुंबईतील आरे कॉलनीत कोसळले हेलिकॉप्टर

वृत्तसंस्था
रविवार, 11 डिसेंबर 2016

मुंबई : गोरेगाव येथील आरे कॉलनीत हेलिकॉप्टर कोसळले आहे. यामध्ये चार जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. हेलिकॉप्टर कोसळल्यानंतर मोठी आग लागली आहे.

घटनास्थळी अग्निशमन दल दाखल झाले आहे. आज दुपारी साडेबाराच्या सुमारास जुहू येथून दोन प्रवाशांसह हेलिकॉप्टरने उड्डाण केले होते. मात्र हेलिकॉप्टरमध्ये काही तांत्रिक बिघाड झाल्याने काही वेळाने पायलटच्या लक्षात आले. मात्र त्यानंतर काही वेळातच हेलिकॉप्टर आरे कॉलनीत कोसळले. हेलिकॉप्टर ज्या भागात कोसळले तो भाग मोकळा असल्याने फार मोठी जिवितहानी टळली.

Web Title: Helicopter crashes in Mumbai's Aarey Colony