भारत हर्ड इम्युनिटीने वाचणार नाही, देशासमोर एकच पर्याय - आरोग्य मंत्रालय

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 30 जुलै 2020

आरोग्य मंत्रालयाचे ओएसडी राजेश भूषण म्हणाले की, कोरोनाची लागण झालेले 10 लाख रुग्ण देशात बरे झाले आहेत ही भारतासाठी जमेची बाजू आहे.

नवी दिल्ली - कोरोनाशी लढण्यासाठी भारतात हर्ड इम्युनिटी हा पर्याय नाही असं मत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने व्यक्त केलं आहे. देशाची लोकसंख्या आणि इतर परिस्थिती पाहता कोरोनापासून वाचण्यासाठी हर्ड इम्युनिटीवर अवलंबून राहता येणार नाही. देशाला कोरोनाविरुद्ध जिंकायचं असेल तर वॅक्सिनची वाट बघावी लागेल. आरोग्य मंत्रालयाचे ओएसडी राजेश भूषण म्हणाले की, कोरोनाची लागण झालेले 10 लाख रुग्ण देशात बरे झाले आहेत ही भारतासाठी जमेची बाजू आहे. 4 जूनपर्यंत भारतात 1 लाख रुग्ण बरे झाले होते तर 30 जुलैपर्यंत हीच संख्या 10 लाखांपर्यंत पोहोचली. डॉक्टर, नर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी यात जोखीम पत्करून लोकांची सेवा केली असल्याचंही ते म्हणाले. 

भारतात उपलब्ध साधने कमी असतानाही कोरोनाला रोखण्यात देशानं बरीच मजल मारली आहे. दहा लाख लोक बरे झाल्याचं सांगितल्यानंतर पत्रकार परिषदेत उपस्थित अधिकाऱ्यांनी डॉक्टर आणि नर्स यांच्यासह आरोग्य कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. 

आरोग्य मंत्रालयाने म्हटलं की, हर्ड इम्युनिटी अजुन दूर आहे आणि याला पर्याय मानता येणार नाही. जोपर्यंत वॅक्सिन येणार नाही तोपर्यंत सावधानता बाळगली पाहिजे. कोरोना व्हायरसपासून वाचण्यासाठी जगभरात 24 वॅक्सिनची क्लिनिकल ट्रायल सुरू आहे. तर 141 प्री क्लिनिकल स्टेजमध्ये आहेत. याशिवाय अमेरिका, चीन आणि ब्रिटनच्या तीन वॅक्सिन तिसऱ्या टप्प्यात आहेत. भारतातही वॅक्सिन पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात आहेत.

हे वाचा - जॉन्सन अँड जॉन्सनच्या लसीची आता मानवी चाचणी; एकाच डोसमध्ये येतोय रिझल्ट

आरोग्य कर्मचाऱ्यांनी केलेल्या क्लेमबाबत मंत्रालयाने माहिती देताना म्हटलं की, 131 कुटुंबियांनी क्लेम केला आहे. यामधील 20 प्रकऱणांमध्ये पेमेंट देण्यात आलं असून 64 प्रकरणांची प्रक्रिया सुरू आहे. याशिवाय 47 केसेस वेगवेगळ्या राज्यांमध्ये आहेत. कोरनाविरुद्धच्या लढाईत सर्वाधिक आरोग्य कर्मचाऱ्यांचा मृत्यू झालेल्या राज्यांमध्ये महाराष्ट्र, दिल्ली आणि तेलंगणा यांचा समावेश आहे. 

Image may contain: text that says "अधिक रिकव्हरीचे राज्ये (आकडे टक्क्यांत) सर्वात कमी मृत्युदर गोवा हिमाचल आसाम प्रदेश केरळ बिहार ओडिशा झारखंड छत्तीसगड दिल्ली लडाख हरियाना आसाम तेलंगण तमिळनाडू गुजरात राजस्थान थान मध्य प्रदेश गोवा ८८ ८० ७८ ७६ ७४ ७३ ७३ ७० ६९ ६८"

मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार 21 राज्यांमधील कोरोना पॉझिटिव्हीटीचा रेट 10 टक्क्यांहून कमी आहे. 7 दिवसांच्या सरासरीच्या आधारावर ही आकडेवारी असून समाधानकारक अशी आहे. त्याचबरोबर 24 राज्यांमध्ये मृत्यू दर हा देशाच्या मृत्यूदरापेक्षा कमी आहे. तर 16 राज्यांमधील रिकव्हरी रेट हा देशाच्या रिकव्हरी रेटपेक्षा जास्त आहे. 

हे वाचा - मोठी बातमी : भारतातील नागरिकांचे सरासरी आयुष्य 5.2 वर्षांनी वाढणार

जगात सर्वाधिक मृत्यू दर इंग्लंडमध्ये 15.3 टक्के इतका आहे. त्याखालोखाल मेक्सिकोचा 11.1 टक्के मृत्यूदर आहे. इराणमध्येही कोरोनामुळे होणाऱ्या मृत्युचे प्रमाण 5.5 टक्के इतके आहे. ब्राझील आणि अमेरिका या दोन देशांमध्ये कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहे. दोन्ही देशांमधील मत्यूदर हा 3.5 टक्क्यांपेक्षा जास्त आहे. भारतात कोरोनाबाधितांच्या मृत्युचे प्रमाण 2.21 टक्के इतकं आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: herd community not option for India says health ministry