Buddha Jayanti 2022: गौतम बुद्धांच्या आयुष्यातील 'या' 20 गोष्टी अनेकांना माहीत नाहीत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Gautam Buddha
Buddha Jayanti 2022: गौतम बुद्धांच्या आयुष्यातील 'या' 20 गोष्टी अनेकांना माहीत नाहीत

Buddha Jayanti 2022: गौतम बुद्धांच्या आयुष्यातील 'या' 20 गोष्टी अनेकांना माहीत नाहीत

Buddha Jayanti 2022: भगवान गौतम बुद्धांचा जन्म वैशाख कृ.14 अर्थात वैशाख पौर्णिमेला झाला. म्हणून वैशाख महिन्यातील पौर्णिमा बुद्धपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. यंदा 16 मे 2022 रोजी बुद्धपौर्णिमा आहे. चला तर मग जाणून घेऊया गौतम बुद्धांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या गोष्टी...(Important things in the life of Gautama Buddha)

 • गौतम बुद्धांचा जन्म इ.स. पूर्व 563 मध्ये नेपाळमधील लुम्बिनी येथे झाला.

 • त्यांच्या वडिलांचे नाव राजा शुद्धोदन आणि आईचे नाव माया होते.

 • सिद्धार्थच्या जन्मानंतर त्याच्या आईचं निधन झाले,

 • त्यानंतर त्यांचा सांभाळ मावशी गौतमी यांनी केला, तिच्याच नावावरून त्यांचं नाव गौतम असं पडलं.

 • एका तपस्वीने शुद्धोदनाला सांगितले होते की सिद्धार्थ मोठा होऊन सर्व जगाचे कल्याण करेल, अशी एका तपस्वीने भाकीत केलं होतं.

 • वयाच्या सोळाव्या वर्षी सिद्धार्थ यांचा विवाह यशोधराशी झाला. पुढे सिद्धार्थ यांची पत्नी यशोधरा हिने एका मुलाला जन्म दिला.

हेही वाचा: Buddha Pournima 2022 : बुद्ध पौर्णिमेचे चंद्रग्रहण कुठून दिसेल ? पाहा...

 • अनेक सेवक, दासी त्यांच्या सेवेमध्ये असायच्या. त्यांच्याकडे उपभोग व चैनीच्या सर्व सोयी होत्या.

 • सिद्धार्थला जगातील दुःख दिसू नये, यासाठी राजा शुद्धोदनानं अनेक प्रयत्न केले.

 • एके दिवशी सिद्धार्थ रथातून फेरफटका मारत असताना त्याला वृद्ध, आजारी व्यक्ती, अंत्ययात्रा, संन्यासी इ. गोष्टी दिसल्या आणि त्याला जीवनातील सत्याची जाणीव झाली.

 • सिद्धार्थ आपल्या महालात गेले आणि पत्नी आणि मुलासह सर्व प्रकारची संपत्ती, राजेशाही, भोग आणि विलास सोडला. त्यावेळी सिद्धार्थचे वय फक्त 27 वर्ष होते.

 • वयाच्या ३५ व्या वर्षी त्यांनी बोधगया (सध्याचे बिहार) येथील बोधीवृक्षाखाली ज्ञान प्राप्ती झाली.

 • वाराणसीजवळ सारनाथ नावाच्या ठिकाणी त्यांनी पहिला उपदेश दिला. येथूनच त्यांनी धर्मचक्र प्रवर्तनाचा प्रारंभ केला.

 • गौतम बुद्धांनी लोकांना चार आर्यसत्य आणि अष्टांग मार्ग सांगितले.

हेही वाचा: बुद्धांनी असं काय पाहिलं की राजेशाही, बायको-मुलगा अन् संपत्तीचा त्याग केला

 • गौतम बुद्धांच्या प्रमुख शिष्यांमध्ये आनंद, अनिरुद्ध, महाकश्यप, रानी खेमा, महाप्रजापती, भद्रिका, भृगु, किम्बाल, देवदत्त, उपाली इ. समावेश आहे.

 • गौतम बुद्धांनी आपलं सबंध आयुष्य लोकांच्या कल्याणासाठी खर्ची घातलं.

 • एके दिवशी एका गरीब व्यक्तीच्या घरी भोजन केल्यानंतर त्यांची प्रकृति खालावू लागली. त्यांनी त्यांच्या अनुयायांना सांगितलं की मीच याची निवड केली होती.

 • इ.स.पू. ४८३ मध्ये वयाच्या ८० व्या वर्षी तथागत बुद्धांचे महापरिनिर्वाण झाले.

 • कुशीनगर, बोधगया, लुंबिनी व सारनाथ ही बौद्ध धर्मामधील चार सर्वात पवित्र स्थाने आहेत.

 • आशिया खंडातील जवळपास 49 टक्के लोकसंख्या बौद्ध आहे.

 • गौतम बुद्धांची शिकवण आज कित्येक वर्षांनंतरही जिवंत आहे. जगातील सर्वात शांत धर्मांमध्ये बौद्ध धर्माचा समावेश होतो. भारतातही बौद्ध धर्मीयांच्या संख्या मोठी आहे.

Web Title: Here Are 20 Important Things In The Life Of Gautama Buddha

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top