भारताचे पहिले पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी झळकले 'गुगल'वर

वृत्तसंस्था
गुरुवार, 26 एप्रिल 2018

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता 2014 च्या लोकसभा निवडणुकांपासून वाढत आहे. त्यांची लोकप्रियता इतकी वाढली की, गुगलवर भारताचे पहिले पंतप्रधान म्हणून चक्क नरेंद्र मोदी यांचा फोटो झळकला. मात्र, पहिले पंतप्रधान म्हणून पं. जवाहरलाल नेहरू यांचे नाव दिसत आहे. 

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता 2014 च्या लोकसभा निवडणुकांपासून वाढत आहे. त्यांची लोकप्रियता इतकी वाढली की, गुगलवर भारताचे पहिले पंतप्रधान म्हणून चक्क नरेंद्र मोदी यांचा फोटो झळकला. मात्र, पहिले पंतप्रधान म्हणून पं. जवाहरलाल नेहरू यांचे नाव दिसत आहे. 

MOdi

गुगलवर देशाचे पहिले पंतप्रधान म्हणून पं. जवाहरलाल नेहरू यांचे नाव दिसत होते. मात्र, फोटो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा झळकत होता. याबाबतची पोस्ट काही नेटिझन्सकडून ट्विटरवर व्हायरल करण्यात आली. त्यामुळे याबाबतची माहिती सर्वांना समजली. त्यानंतर गुगलकडून लगेचच यामध्ये बदल करण्यात आला असून, पंतप्रधान मोदींचा फोटो काढून टाकण्यात आला आहे. दरम्यान, याबाबत गुगलकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आली नाही. 

Web Title: Here is India First Prime Minister Google Search is Showing Narendra Modi Photo