संघाच्या कार्यक्रमास न्यायालयाची परवानगी

वृत्तसंस्था
शुक्रवार, 13 जानेवारी 2017

कोलकता : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एका कार्यक्रमास उच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे. परवानगी देतानाच न्यायालयाने काही अटी घातल्या असून सरसंघचालक मोहन भागवत यांच्या उपस्थित हा कार्यक्रम होणार आहे.

कोलकता : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एका कार्यक्रमास उच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे. परवानगी देतानाच न्यायालयाने काही अटी घातल्या असून सरसंघचालक मोहन भागवत यांच्या उपस्थित हा कार्यक्रम होणार आहे.

मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर ब्रिगेड परेड मैदानावर हा कार्यक्रम घेण्याचे नियोजन संघाने केले होते. मात्र, त्यास पोलिसांनी नकार दर्शविला होता. हे प्रकरण न्यायालयात गेल्यानंतर आज त्यावर सुनावणी घेत न्यायालयाने कार्यक्रम घेण्यास होकार दर्शविला. मात्र, प्रेक्षक संख्या 4 हजार असावी, दुपारी 2 ते 6 या वेळेत कार्यक्रमाचे आयोजन व्हावे, अशा काही अटी न्यायालयाने घातल्या आहेत.

Web Title: High court allows RSS to hold sankranti rally