मटका जुगारविरोधी एसआयटीमध्ये आयपीएस अधिकारी नेमा - उच्च न्यायालय 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 जुलै 2018

हल्लीच आयपीएस अधिकारी व उत्तर गोवा पोलिस अधिक्षक चंदन चौधरी यांनी धाडसी कारवाई करून मोरजी - पेडणे येथून 60 लाखांची रक्कम व 11 जणांना ताब्यात घेतले होते.

गोवा - राज्यातील मटका जुगार आटोक्यात आणण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करूनही हे पथक अपयशी ठरले आहे. त्यामुळे गोवा खंडपीठाने हस्तक्षेप करत आयपीएस पोलिस अधिकाऱ्याची या पथकावर वर्णी लावण्याची शिफारस केली आहे. 

एसआयटी पथक स्थापन होऊन एक वर्ष उलटून गेले तरी या मटका जुगाराच्या मुळापर्यंत जाण्याचे सोडाच उलट राज्यातील मटका जुगार बंद करण्यास या पथकाने काहीच पावले उचलली नसल्याचे याचिकादाराने खंडपीठाच्या निदर्शनास आणून दिल्याने खंडपीठाने त्याची गंभीर दखल घेतली. 

हल्लीच आयपीएस अधिकारी व उत्तर गोवा पोलिस अधिक्षक चंदन चौधरी यांनी धाडसी कारवाई करून मोरजी - पेडणे येथून 60 लाखांची रक्कम व 11 जणांना ताब्यात घेतले होते. त्यांच्या या कामगिरीमुळे गोवा खंडपीठाने मटका जुगारप्रकरणीच्या जनहित याचिकेवरील सुनावणीवेळी आयपीएस अधिकाऱ्याचा या पथकामध्ये समावेश करण्याचे सुनावले आहे.
 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: High Court Ordered that do appointed IPS officer at SIT against gambling