ओपीएस यांच्या भ्रष्टाचाराची चौकशी का नाही : न्यायालय

High Court Questions Why No Probe Started Against OPS
High Court Questions Why No Probe Started Against OPS

चेन्नई- बेहिशोबी मालमत्ताप्रकरणी उपमुख्यमंत्री ओ. पनीरसेल्वम यांच्या भ्रष्टाचाराची चौकशी का नाही, याबाबतचा खुलासा मद्रास उच्च न्यायालयाने आज दक्षता आयोग आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला मागितला.

द्रमुकच्या राज्यसभेच्या खासदार आर. एस. भारती यांच्या याचिकेवर न्यायाधीश जी. जयचंद्रन यांच्या न्यायालयात सुनावणी झाली. ओ. पनीरसेल्वम यांच्याविरुद्ध तीन महिन्यांपूर्वी तक्रार येऊनही चौकशी का झाली नाही, असे न्यायालयाने विचारले आहे.

ओपीएस यांनी आपल्या अधिकाराचा गैरवापर केल्याचा आरोप याचिकेत केला असून, कुटुंबाच्या ऐषआरामासाठी बेहिशोबी मालमत्ता जमवली असल्याचे म्हटले आहे. त्यांची पत्नी गृहिणी असताना आणि उत्पन्नाचे कोणतेही साधन नसताना पत्नीच्या नावावर मोठ्या प्रमाणात मालमत्ता असल्याचे भारती यांनी नमूद केले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com