चिदंबरम यांना कोर्टाचा दिलासा 

वृत्तसंस्था
बुधवार, 4 जुलै 2018

आयएनएक्‍स मीडियाप्रकरणी माजी अर्थमंत्री आणि कॉंग्रेस नेते पी. चिदंबरम यांना दिलासा मिळाला आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने चिदंबरम यांच्या अटकेला मनाई करणाऱ्या हंगामी आदेशाला 1 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ दिली आहे. आयएनएक्‍सप्रकरणी सीबीआयला चिदंबरम यांची चौकशी करायची आहे.
 

नवी दिल्ली - आयएनएक्‍स मीडियाप्रकरणी माजी अर्थमंत्री आणि कॉंग्रेस नेते पी. चिदंबरम यांना दिलासा मिळाला आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने चिदंबरम यांच्या अटकेला मनाई करणाऱ्या हंगामी आदेशाला 1 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ दिली आहे. आयएनएक्‍सप्रकरणी सीबीआयला चिदंबरम यांची चौकशी करायची आहे.

आर्थिक गैरव्यवहाराचे प्रकरण आयएनएक्‍स मीडिया कंपनीशी निगडित आहे. आयएनएक्‍स मीडियाच्या संचालिका शिना बोरा हत्याकांडात इंद्राणी मुखर्जी आरोपी आहेत. या कंपनीला परदेशातून 305 कोटींचा निधी मिळवून देण्यासाठी परकी गुंतवणूक प्रोत्साहन मंडळ (एफआयपीबी)ने परवानगी दिली होती, मात्र ही परवानगी देताना अनियमितता आढळून आली. यूपीए-1 सरकारच्या काळात दिलेल्या परवानगीच्या वेळी चिदंबरम अर्थमंत्री होते. या प्रकरणात त्यांचा मुलगा कार्ती याचेही नाव समोर आले. सीबीआयच्या मते, कार्तिने आयएनएक्‍स मीडियाला एफआयपीबीची परवानगी मिळवून देण्यासाठी दहा लाख रुपयांची लाच घेतली. तसेच इंद्रानीच्या कंपनीविरुद्ध कराचे एक प्रकरण मिटवण्यासाठी आपल्या वडिलांच्या पदाचा वापर केल्याचाही कार्तीवर आरोप आहे. 

Web Title: High Court relief to Chidambaram