कोरोनाच्या संसर्गाचा उच्चांक; देशातील बाधितांची संख्या दहा लाखांवर

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 18 जुलै 2020

देशात कोरोनाग्रस्तांच्या संख्येने दहा लाखाचा टप्पा ओलांडला आहे. आता दररोज ३० हजाराहून अधिक नवे रुग्ण सापडत असून आतापर्यंतचा हा उच्चांक आहे.  अर्थात, रुग्णसंख्या वाढली असली तरी भारतातील रिकव्हरी रेट (कोरोनामुक्तीचा दर) ६३.२५ टक्के असून देश विजयाच्या जवळ असल्याचा दावा आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी केला आहे.

नवी दिल्ली - देशात कोरोनाग्रस्तांच्या संख्येने दहा लाखाचा टप्पा ओलांडला आहे. आता दररोज ३० हजाराहून अधिक नवे रुग्ण सापडत असून आतापर्यंतचा हा उच्चांक आहे.  अर्थात, रुग्णसंख्या वाढली असली तरी भारतातील रिकव्हरी रेट (कोरोनामुक्तीचा दर) ६३.२५ टक्के असून देश विजयाच्या जवळ असल्याचा दावा आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी केला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार शुक्रवारी सकाळी संपलेल्या २४ तासांमध्ये भारतात कोरोनाचे ३४९५६ नवे रुग्ण सापडले. त्यामुळे कोरोनाग्रस्तांच्या संख्येने दहा लाखांचा आकडा पार केला. आतापर्यंत एकाच दिवसात सर्वाधिक रुग्ण आढळण्याचा हा विक्रम आहे. असे असले तरी  ६,३५,७५७ रुग्ण बरे झाले आहेत.

या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी ट्विट द्वारे सांगितले, की कोरोनामुक्तीचा दर भारतात आता ६३.२५ टक्के झाला आहे. देशातील कोरोना संक्रमण आता किरकोळ लक्षणे असणारे आहे. केवळ ०.३२ टक्के रुग्ण व्हेंटीलेंटरवर असून तीन टक्क्यांपेक्षा कमी रुग्णांनाच प्राणवायूची आवश्यकता आहे.

भारतात गरीबी कमी झाली; संयुक्त राष्ट्राचा अहवाल

राष्ट्रीय राजधानी दिल्ली आणि आर्थिक राजधानी मुंबई या शहरांवर सरकारचे बारीक लक्ष आहे. महाराष्ट्रात कोरोनाचे थैमान सुरू असून राज्यात आतापर्यंत २९२५७९ रुग्णसंख्या झाली आहे. ११४५२ जणांनी प्राण गमावले आहेत. एकट्या मुंबईतत ९७९५० रुग्ण असून ५५२३ जण मृत्यूमुखी पडले आहेत. तुलनेने दिल्लीमध्ये प्रमाण कमी असल्याचे सरकारचे म्हणणे आहे.

दिल्लीतील रिकव्हरी रेट ८२.३४ टक्क्यांवर पोहोचला असून एकूण रुग्णसंख्या १२०१०७ झाली आहे. तर १७४०७ सक्रीय रुग्ण आहेत. रुग्णालयांमध्ये १५३६४ खाटा उपचारासाठी तयार ठेवण्यात आल्या असल्या तरी  ३८१९ रुग्ण असून ७५.१४ टक्के म्हणजे ११५४५ खाटा मोकळ्या आहेत.

"वाद आता चर्चेने सुटेल याची हमी नाही"; राजनाथ सिंहाच्या वक्तव्याचा अर्थ काय

संक्रमणाचे प्रमाण
(दहा लाखामागे)

जगाची सरासरी - १६३८
भारत - ६३७
रशियात ५०२८
अमेरिका - ९७४६
ब्राझील - ८६५६
स्पेन - ५४२१

मृत्यूचे प्रमाण
(दहा लाख लोकसंख्येमागे)

जागतिक सरासरी - ७३
भारत १७.२
ब्रिटन - ६६०
स्पेन - ६०७
अमेरिका - ४०६, 
ब्राझील- ३३६ 
मेक्सिकोमध्ये - २६९

६३.२५ टक्के - कोरोनामुक्तीचा दर
०.३२ टक्के - व्हेंटीलेटरवरील रुग्ण
२.८१ टक्के - ऑक्सिजनची गरज असलेले रुग्ण

ऑगस्टपर्यंत भारतात २० लाख जण कोरोनाग्रस्त होतील. सरकारने ठोस उपाययोजना सरकारने करावी.
- राहुल गांधी, काँग्रेस नेते

केरळमध्ये सामूहिक संसर्गाला सुरवात
केरळची राजधानी तिरूअनंतपुरमच्या काही किनारी भागांमध्ये कोरोनाच्या सामूहिक संसर्गाला सुरवात झाली असल्याची धक्कादायक माहिती केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन यांनी आज दिली. पूनथुरा आणि पुल्लूव्हिला परिसरातील स्थिती अत्यंत गंभीर बनली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान केंद्र सरकारने मात्र देशातील सामूहिक संसर्गाची शक्यता फेटाळून लावली आहे. किनारी भागामध्ये लवकरच संपूर्ण लॉकडाउन केले जाणार असून त्याचे काटेकोर पालन करण्यात येईल असे विजयन यांनी स्पष्ट केले.

कोरोना संसर्गाच्या काळात आम्ही दीडशे देशांना मदत केली, सार्क कोविड फंड तयार केला. आम्ही सरकारच्या प्रयत्नांना जनतेशी जोडले. कोरोनाविरोधातील संघर्ष ही जनतेची लढाई बनवली. सध्या आमच्या देशातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे.
- नरेंद्र मोदी, पंतप्रधान
(संयुक्त राष्ट्रसंघाच्या पंचाहत्तरीनिमित्त केलेल्या भाषणातील अंश)

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: highest number of corona infections in the country is in the tens of millions