पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत सर्वाधिक वाढ

petrol
petrol

नवी दिल्ली : मागील चार महिन्यात पेट्रोल व डिझेलच्या किंमतींनी सर्वोच्च आकडा गाठला आहे. मुंबईत पेट्रोलची किंमत सर्वाधिक म्हणजेच 86.56 प्रति/ली. रूपयांवर पोहोचली आहे, तर डिझेलची किंमत 75.54 प्रति/ली. रूपयांवर पोहोचली आहे. तर राजधानी दिल्लीत पेट्रोलची किंमत 79.15 रूपये प्रति/ली. इतकी आहे, तर डिझेलची किंमत 71.15 रूपये प्रति/लीटर इतकी आहे. 

आंतरराष्ट्रीय पातळीवरील कच्चा तेलाच्या वाढत्या किंमतीमुळे देशातील पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ झाली आहे. तसेच डॉलरच्या तुलनेत रूपयाच्या घसरणीचाही परिणाम पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतीवर झाला आहे, अशी माहिती पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिली.  

कोलकात्यात पेट्रोलची किंमत 82.06 प्रति/लीटरवर पोहोचली आहे, तर चेन्नईत 82.24 प्रति/लीटरवर पोहोचली आहे. यापूर्वी मुंबईमध्ये मे महिन्यात पेट्रोलची किंमत 78.43 प्रति/ली होती, तर आज पेट्रोलची किंमत मुंबईत 86.24 प्रति/लीटरवर पोहोचली आहे. कच्चा तेलाच्या बॅरलच्या किंमतीत 7 डॉलर्सने वाढ झाली आहे. तसेच अमेरिकेने इराणवर लावलेल्या प्रतिबंधामुळे आता हा पुरवठा कमी होईल.

सीएनजी (कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस) व पीएनजीच्या (पाईप नॅचरल गॅस) किंमती या रूपयाच्या घसरणीमुळे मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. 16 ऑगस्टनंतर पेट्रोलच्या किंमतीत 2 रूपयांनी वाढ झाली तर, डिझेलच्या किंमतीत 2.42 रूपयांनी वाढ झाली आहे. 

ऑगस्टमध्ये विरोधी पक्षांनी व अनेक औद्योगिक संघटनांनी इंधनावरील उत्पादन शुल्क कमी करण्याबाबक सरकारकडे मागणी केली होती. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com