इंधनाचा भडका, बजटचा कंडका ! 

इंधनाचा भडका, बजटचा कंडका ! 

बेळगाव - दिवसेंदिवस पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होत असल्यामुळे सर्वसामान्य लोकांमधून तीव्र संताप व्यक्‍त होत आहे. अच्छे दिन आने वाले है असे म्हणत सत्तेत असलेल्या सरकारच्या काळात इंधनाचे दर गगनाला भिडत असून त्यामुळे सामान्यांचे बजट कोलमडत आहे. त्यामुळे संताप व्यक्‍त होत आहे. 

रोज पेट्रोल व डिझेलच्या दरात वाढ केली जात आहे. रविवारी शहरातील पेट्रोल पंपावर पेट्रोलचा दर 83 रुपये 25 पैशांपर्यंत पोहचला आहे तर डिझेल 79 रुपयांच्या घरात येऊन पोहचले आहे. त्यामुळे सर्वांनाच वाहन चालविणे मुश्‍किल झाले आहे. दरवाढीच्या बाबतीत सरकारने तातडीने पावले उचलावीत. सामान्यांच्या खिशावर पडणारा ताण कमी करावा, अशी मागणी होत आहे. 

महिनाभरात पाच रूपयांपर्यंत वाढ 
2 ऑगस्टला पेट्रोलचा दर 70.20 रुपये इतका होता तर डिझेल 75.20 रुपये इतका होता. यानंतर रोज काही पैशांची वाढ होत रविवारी शहरात पेट्रोलचा दर 83.25 रुपये तर डिझेल 78.99 रुपयांपर्यंत पोहचला आहे. गेल्या काही दिवसात पेट्रोलच्या दरात चार रुपये सव्वीस पैसे तर डिझेलच्या दरात 4.90 इतकी वाढ झाली आहे. 

वर्षभरात पेट्रोलचे दर प्रचंड प्रमाणात वाढले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य लोकांना वाहन चालविणेही मुश्‍किल झाले आहे. त्यामुळे सरकारने त्वरीत दरवाढीवर नियंत्रण आणणे गरजेचे आहे, अन्यथा नागरीकांना महागाई वाढीचा फटका सहन करावा लागणार आहे. 
- लक्ष्मीकांत मॅगेरी 

सध्या सर्वांनाच दर वाढीचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. तरीही सरकार गप्प असून दरवाढीमुळे इतर वस्तुंच्याही दरात मोठी वाढ पहावयास मिळत आहे. दर 83 रुपयांच्या पुढेही गेला त्यामुळे गरीब लोकांना वाहन चालविणे मुश्‍किल झाले आहे. अच्छे दिन आले म्हणून सत्तेत आलेल्या सरकारने सर्वांची निराशा केली आहे. 
- अल्ताफ सनदी 

पेट्रोल दराबाबतही सरकार राजकारण करीत असून आपला देश 12 देशांना पेट्रोलची विक्री करीत आहे, त्या देशाना 35 रुपये प्रति लिटर पेट्रोलचा पुरवठा करीत आहे. देशातील नागरीकांना 83 रुपयांपेक्षा जास्त दराने पेट्रोल खरेदी करावे लागत आहे. त्यामुळे सरकारने पेट्रोल व डिझेलवरही जीएसटी लावणे आवश्‍यक आहे.
- अॅड. नागेश सातेरी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com