कर्नाटक परिवहनकडून मुंबई-बंगळूर मार्गावर तिकीट दरवाढ

कर्नाटक परिवहनकडून मुंबई-बंगळूर मार्गावर तिकीट दरवाढ

बेळगाव - ऐन निवडणुकीच्या काळात परिवहन मंडळाने आपल्या व्होल्वो आणि स्लिपर कोच आंतरराज्य बस तिकीट दरात वाढ केली आहे. एक एप्रिलपासून मुंबई-बंगळूर मार्गावर १०० ते १५० रुपये तिकीट दरवाढ होत असून याचा फटका सर्वसामान्यांना बसणार आहे. उन्हाळी सुटी आणि निवडणूक काळात नागरिकांची ये-जा लक्षात घेऊन परिवहन मंडळाने ही दरवाढ घोषित केली आहे.

निवडणुकीच्या काळात निवडणूक आयोगाकडून परिवहन मंडळाच्या अर्ध्याअधिक बस मतदान आणि मतमोजणी कामासाठी वापरल्या जाणार आहेत. त्यामुळे एप्रिल महिन्यात बस संख्या कमी राहणार आहेत. याचा फायदा दरवेळी खासगी आराम बसकडून घेतला जातो. निवडणुकीच्या काळात तसेच उन्हाळी सुट्टीवेळी खासगी बसचालकांकडून भरमसाठ बस दरवाढ केली जाते, मात्र परिवहन मंडळाकडून तशी दरवाढ केली जात नाही. यंदा प्रथमच परिवहन मंडळानेही उन्हाळी सुट्टीचा फायदा घेण्याचा निर्णय घेतला आहे. १ एप्रिलपासूनच आंतरराज्य सेवेचे नवे दरांची अंमलबजावणी केली जाणार आहे. त्यामुळे सुट्टीसाठी प्रवास करणाऱ्यांच्या खिशाला मोठा फटका बसणार आहे. 

उत्तर कर्नाटकात १७ एप्रिल रोजी तर दक्षिण कर्नाटकात २३ एप्रिल रोजी मतदान आहे. त्यामुळे १५ एप्रिलपासून राज्यात मतदानस्थळी मतपेटी, मतदार कर्मचारी, पोलिस यांच्यासाठी परिवहन मंडळाच्या बस निवडणूक आयोगाकडून ताब्यात घेतल्या जाणार आहेत.  सध्या बेळगाव-बंगळूरसाठी अनेक खासगी बस कंपन्या ९०० ते १६०० रुपये तिकीटदर आकारणी करतात. मात्र एप्रिल महिन्यात परिवहनच्या बस निवडणूक कार्यासाठी जाताच खासगी कंपन्यांकडून हाच दर १८०० ते २२०० रुपयांपर्यंत जाऊ शकतो अशी शक्‍यता वर्तवली जात आहे. परिवहन मंडळाचा दर मात्र १ हजार रुपयांच्या आत असणार आहे.

परिवहन मंडळाचे एप्रिल महिन्यातील सुधारित दर
मार्ग    व्होल्वो    स्लीपर    सामान्य (रुपयात)
मुंबई    --    ९६१    ७१६
पुणे    ६८२    ७५२    ४६६/४११
शिर्डी    ८९१    ९६१    ७८६
बंगळूर    ८३२    १०२५    ५६४/५५७

परिवहनचे सध्याचे दरपत्रक
मार्ग    व्होल्वो    स्लीप    सामान्य (रुपयात)
मुंबई    --    ८७२    ७१६
पुणे    ६२२    ६७७    ४६६/४११
शिर्डी    ८०५    ८७४    ७८६
बंगळूर    ७६०    ९४५    ५६४

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com