हिमाचलमध्ये सत्ताबदल; भाजपला बहुमत

Himachal Pradesh
Himachal Pradesh

शिमला : भाजपला हिमाचल प्रदेशात वीरभद्रसिंह यांचे सरकार उलथवून लावण्यात भाजपला यश आले असून, भाजप सत्ता स्थापनेजवळ पोचले आहे.

भाजपने प्रेम कुमार धुमल यांच्या नेतृत्वाखाली याठिकाणी निवडणूक लढविली होती. हिमाचल प्रदेशात 68 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपने बहुमताचा आकडा पार केला असून, भाजपने 40 पेक्षा अधिक जागा मिळविल्या आहेत. बहुमतासाठी 35 जागांची आवश्यकता असताना भाजपने मोठी आघाडी घेतली आहे. तर, काँग्रेसला 25 जागा मिळविण्यात यश आले आहे. 

हिमाचल प्रदेशचा मागील 24 वर्षांचा राजकीय इतिहास अभ्यासला असता येथे कॉंग्रेस आणि भाजप आलटून पालटून सत्ताधीश झाल्याचे दिसते. यंदाही तसेच झाल्याचे दिसते. हिमाचल प्रदेशात यंदा 75.28 टक्के एवढ्या रेकॉर्डब्रेक मतदानाची नोंद झाल्याने राजकीय विश्‍लेषकांच्या भुवया उंचावल्या होत्या. मतदानोत्तर चाचण्यांचा कल भाजपच्या दिशेने देण्यात आला होता आणि तसेच झाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com