Parwanoo Timber Trail : 3 तासांच्या प्रयत्नानंतर सर्व 11 पर्यटकांची सुटका

Parwanoo Timber Trail : 3 तासांच्या प्रयत्नानंतर सर्व 11 पर्यटकांची सुटका

शिमला : हिमाचल प्रदेशातील सोलन जिल्ह्यात तीन तासांहून अधिक काळ केबल कारमध्ये अडकलेल्या सर्व पर्यटकांची सुटका करण्यात आली आहे, अशी माहिती हिमाचल प्रदेशचे आपत्ती व्यवस्थापनचे प्रधान सचिव ओंकार चंद शर्मा यांनी दिली आहे. केबल कारमधील तांत्रिक बिघाडामुळे परवानू परिसरातील टिंबर ट्रेलमध्ये साधारण 15 पर्यटक अडकले होते. दरम्यान, आता या ठिकाणचं रेस्कू ऑपरेशन पूर्ण झाले असून सर्व पर्यटकांची सुखरुप सुटका करण्यात आली आहे. (HImachal Parwanoo Timber Trail News )

तांत्रिक कारणामुळे केबल कारमध्ये बिघाड झाल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांकडून मदतकार्य सुरू करण्यात आले होते. घटनेची माहिती मिळताच हिमाचलचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर हे घटनास्थळी दाखल झाले होते. त्यानंतर साधारण तीन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर या सर्व प्रवाशांना सुखरुप वाचवण्यात जवानांना यश आले आहे.

देवघर अपघातात तिघांचा मृत्यू

काही दिवसांपूर्वी झारखंडमधील देवघर येथील त्रिकूटजवळ (Deoghar Cabal Car Accident) झालेल्या रोपवेच्या (Rope-way) अपघातात तिघांचा मृत्यू झाला होता. यातील इतर पर्यटकांना वाटवण्यासाठी भारतीय लष्कर, हवाई दल, एनडीआरएफ, इंडो-तिबेट बॉर्डर पोलिस (आयटीबीपी) आणि जिल्हा प्रशासनाने तब्बल 46 तासांच्या अथक प्रयत्नांनंतर यातील प्रवाशांना सुखरुप बाहेर काढले होते. हा अपघातदेखील तांत्रिक बिघाडामुळे घडला होता. त्यानंतर आता हिमाचल प्रदेशमध्ये पुन्हा तशाच प्रकारची घडल्याने अशा प्रकारच्या ट्रॉलीमधून प्रवास करणे धोक्याचे ठरू लागले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com