हिमाचलही ठरले शंभर टक्के आधार नोंदणी राज्य!

वृत्तसंस्था
रविवार, 18 डिसेंबर 2016

शिमला : नवी दिल्ली, तेलंगणा, हरियाना, पंजाब, चंदिगडनंतर आता हिमाचल प्रदेशही शंभर टक्के आधार नोंदणी असलेले राज्य ठरले अहे. त्यामुळे आता देशभरात एकूण सहा राज्ये शंभर टक्के आधार नोंदणी राज्य ठरले आहेत.

शिमला : नवी दिल्ली, तेलंगणा, हरियाना, पंजाब, चंदिगडनंतर आता हिमाचल प्रदेशही शंभर टक्के आधार नोंदणी असलेले राज्य ठरले अहे. त्यामुळे आता देशभरात एकूण सहा राज्ये शंभर टक्के आधार नोंदणी राज्य ठरले आहेत.

आधार नोंदणीची 2015 च्या जनगणनेच्या आकड्याशी तुलना केली जाते. या आधारे देशातील सहा राज्ये शंभर टक्के आधार नोंदणी राज्ये ठरली आहेत. हिमाचल प्रदेशमध्ये आतापर्यंत 72 लाख 52 हजार 880 जणांनी आधार नोंदणी केली आहे. भविष्यातही आधार नोंदणीसाठी प्रोत्साहन दिले जाणार आहे. त्यासाठी अंगणवाडी आणि आरोग्य सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांची मदत घेण्यात येणार आहे. हिमाचल प्रदेशमध्ये 240 कायमस्वरुपी आधार नोंदणी केंद्रे उभारण्यात आली आहेत. या केंद्रामध्ये नव्याने आधार नोंदणीसह, पूर्वी नोंदणी केलेल्या आधारमध्ये बदल करण्याची सुविधा देण्यात आली आहे. याशिवाय, ज्येष्ठ नागरिक आणि दुर्गम भागातील नागरिकांना आधार नोंदणी करता यावी यासाठी 22 मोबाईल आधार व्हॅन्सही कार्यान्वित करण्यात आल्या आहेत.

Web Title: Himachal Pradesh becomes sixth state in India to attain 100% aadhar saturation