हिंदीची सक्ती अमान्य

तमिळनाडूत भाजपला मिळाला घरचा आहेर
BJP Annamalai
BJP Annamalaisakal

चेन्नई : हिंदीची सक्ती कदापी स्वीकारली जाणार नाही, अशी गर्जना करीत भाजपचे तमिळनाडू प्रदेशाध्यक्ष अन्नमलाई यांनी केली आहे. यामुळे भाजपला घरचा आहेर मिळाला.

हिंदीच्या सक्तीवरून केंद्रातील सत्ताधारी भाजपची दक्षिणेतील राज्यांशी जुंपली आहे. यात भाजपच्या पदाधिकाऱ्याने प्रथमच विरोध दर्शविणारी प्रतिक्रिया जाहीरपणे व्यक्त केली.,अन्नमलाई म्हणाले की, कोणत्याही कारणासाठी हिंदीची सक्ती स्वीकारली जाणार नाही तसेच कुणाला लादू देणार नाही अशी तमिळनाडू भाजपची स्पष्ट भूमिका आहे. १९८६ मध्ये दुसऱ्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या अंतर्गत हिंदीच्या सक्तीचा प्रयत्न झाला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नव्या शिक्षण धोरणात हिंदीच्या सक्तीला मंजुरी दिली नव्हती. वास्तविक मसुद्यात तसा उल्लेख होता, मात्र नंतर ऐच्छिक भाषा असा बदल करण्यात आला, असेही त्यांनी नमूद केले.

तमिळ अभिनेत्याची हिंदीविरोधाची साद

प्रसिद्ध तमिळ अभिनेते सिलम्बरासन ऊर्फ सिम्बू यांनी याविषयी ट्विट केले आहे. चला आपण तमिळच्या नावाने एकत्र येऊयात, अशा शब्दांत त्यांनी साद घातली. तमीळ भाषा ऋणानुबंध निर्माण करते अशा आशयाचा TamilConnects हा हॅशटॅग त्यांनी वापरला आहे. त्यांनी ट्विटसाठी तमीळ भाषेचाच वापर केला आहे. त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com