हिंदू महासभेच्या कार्यकर्त्यांकडून मुलींना सुऱ्यांचे वाटप

Hindu Mahasabha distributes knives to minor children on savarkar birth anniversary
Hindu Mahasabha distributes knives to minor children on savarkar birth anniversary

आग्रा : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त हिंदू महासभेच्या कार्यकर्त्यांनी मुलींना कट्यार, चाकू अशा वस्तू भेट म्हणून दिल्या आहेत. मुलींच्या स्वसंरक्षणासाठी ही शस्त्रे दिल्याचे हिंदू महासभेच्या पूजा पांडेने म्हटले आहे. पूजा पांडेच्या कार्यालयात या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

दहावी व बारावीमध्ये शिक्षण घेत असलेल्या मुलींना ही शस्त्रे मंगळवारी (ता. 28) देण्यात आली. हिंदू महासभेकडून आठवड्यातून दोन वेळे ही शस्त्रे चालवण्याचं प्रशिक्षणही दिले जाणार आहे. वर्षभरापूर्वी गांधी जंयत्तीनिमित्त पूजा पांडेने महात्मा गांधीजींच्या प्रतिकात्मक पुतळ्याला गोळ्या मारण्याचे कृत्य केले होतं. पूजा पांडे ही हिंदू महासभेची राष्ट्रीय सचिव आहे.

पुजा पांडे म्हणाली, 'कट्यार आणि चाकू वाटपामुळे कुणी घाबरत असेल, तर त्याची गरज नाही. जेल आपल्यासाठी कारागृह नाही तर तीर्थक्षेत्र आहे.  सावरकर, नथुराम गोडसेसारखे आदर्श आपण मानतो. आपल्या क्रांतीविरांनीही जेलवारी केली आहे. त्यामुळे आपण त्याला घाबरत नाही. सुरीबरोबरच मुलांना भगवदगीतेच्या प्रतीचेही वाटप करण्यात आले आहे. परीक्षांमध्ये चांगल्या गुणांसह उत्तीर्ण होणाऱ्या मुलांना हे जाणून घ्यायचे आहे की, या शस्त्राचा वापर कधी आणि कसा करायचा. मला केवळ त्यांना आपल्या मुली-बहिणी किंवा कुटुंबातील सदस्यांचे रक्षण करण्यासाठी ते बळकट आणि सक्षम असल्याची जाणीव करून द्यायची आहे.'

हिंदू महासभेचे प्रवक्ते अशोक पांडे म्हणाले, 'राजकारणाचे हिंदूकरण आणि हिंदूंचे सैनिकीकरण करणे सावरकरांचे स्वप्न होते. मोदींनी लोकसभा निवडणुकीत ऐतिहासिक यश संपादन करून सावरकरांचे पहिले स्वप्न पूर्ण केले आहे. आता आम्ही या सुऱ्यांचे वाटप करत त्यांचे दुसरे स्वप्न पूर्ण करत आहोत. हिंदूंना जर स्वतःचे आणि देशाचे संरक्षण करायचे असेल तर त्यांना हत्यारांचा वापर करणे शिकावे लागेल.'

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com