गांधींजींच्या प्रतिमेला गोळ्या झाडणाऱ्यांवर गुन्हा दाखल

वृत्तसंस्था
गुरुवार, 31 जानेवारी 2019

महात्मा गांधी यांची आज 71वी पुण्यतिथी असल्याने हिंदू महासभेच्या कार्यकर्त्यांनी महात्मा गांधी यांच्या प्रतिमेवर गोळ्या झाडल्या. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हिंदू महासभेच्या नेत्या पूजा शकुन पांडे यांच्यासह 13 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला, असे अलिगडचे वरिष्ठ पोलिस अधीक्षक आकाश कुल्हारे यांनी सांगितले. 

लखनौ : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी दिनी त्यांच्या प्रतिमेवर गोळ्या झाडणाऱ्या हिंदू महासभेच्या 13 जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. यात एका महिला नेत्याचाही समावेश आहे. ही घटना अलिगडमधील नौरंगाबाद भागातील एका घरात ही घटना बुधवारी घडली. 

महात्मा गांधी यांची आज 71वी पुण्यतिथी असल्याने हिंदू महासभेच्या कार्यकर्त्यांनी महात्मा गांधी यांच्या प्रतिमेवर गोळ्या झाडल्या. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हिंदू महासभेच्या नेत्या पूजा शकुन पांडे यांच्यासह 13 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला, असे अलिगडचे वरिष्ठ पोलिस अधीक्षक आकाश कुल्हारे यांनी सांगितले. 

या प्रकरणी आतापर्यंत कोणालाही अटक केली नसल्याचे त्यांनी सांगितले. आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी छापेसत्र सुरू केले आहे. यावेळी वापरण्यात आलेले एअर पिस्तुलही जप्त करण्यात आले आहे. नौरंगाबाद येथील एका घरात हे कृत्य घडले आहे. या कृत्यावेळी हिंदू महासभेच्या नेत्या पूजा पांडे 'महात्मा नथुराम गोडसे अमर रहे' अशा घोषणा देत होत्या. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hindu Mahasabha Leader Among 13 Booked For Shooting Mahatma Gandhis Effigy

टॅग्स