'महात्मा नथूराम गोडसे अमर रहे...'

Hindu Mahasabha reacts nagative on Death anniversary of Mahatma Gandhi
Hindu Mahasabha reacts nagative on Death anniversary of Mahatma Gandhi

नवी दिल्ली : आज राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 70 व्या पुण्यतिथी निमित्त देशभरच नव्हे तर जगभर त्यांना आदरांजली अर्पण करण्यात येत आहे. तर दुसरीकडे हिंदू महासभा कडून गांधी यांची हत्या करणाऱ्या नथूराम गोडसे यांच्या नावे 'अमर रहे'च्या घोषणा दिल्या जात आहेत!

उत्तर प्रदेश येथील अलीगढमध्ये हिंदू महासभेच्या कार्यकर्त्यांनी नथूराम यांनी गांधी यांची हत्या कशी केली, याची दृश्य स्वरुपात प्रतिकात्मक कृती केली. महासभेचे राष्ट्रीय सचिव पूजा शकुन पांडे यांनी एका कृत्रिम बंदूकीतून गांधी यांच्या पुतळ्यावर गोळी झाडली. पुतळ्याच्या आत प्रतिकात्मक रक्त म्हणून लाल रंग ठेवला होता. गोळी मारल्यावर हे प्रतिकात्मक रक्त वाहिले. 

'महात्मा नथूराम गोडसे अमर रहे..अमर रहे' आणि 'अखिल भारतीय हिंदू महासभा..जिंदाबाद..जिंदाबाद' अशा घोषणा देत गांधी यांच्या विरुध्दचा रोष महासभा कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. याशिवाय गोडसे यांना पुष्पार्पण केले गेले व गांधी यांचा पुतळा जाळण्यात आला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com