नोटांवर गांधीऐवजी सावरकर हवेत - हिंदू महासभा 

वृत्तसंस्था
मंगळवार, 29 मे 2018

अखिल भारतीय हिंदू महासभेने भारतीय नोटेवरील चित्र बदलण्याची मागणी केली केंद्राकडे केली आहे. केंद्र सरकारला याबाबत त्यांनी पत्रही पाठवले आहे. भारतीय नोटांवर आता महात्मा गांधी यांचे चित्र आहे, त्यांच्याऐवजी वीर सावरकर यांचे चित्र असावे अशी मागणी हिंदू महासभेने केली आहे.

नवी दिल्ली - अखिल भारतीय हिंदू महासभेने भारतीय नोटेवरील चित्र बदलण्याची मागणी केली केंद्राकडे केली आहे. केंद्र सरकारला याबाबत त्यांनी पत्रही पाठवले आहे. भारतीय नोटांवर आता महात्मा गांधी यांचे चित्र आहे, त्यांच्याऐवजी वीर सावरकर यांचे चित्र असावे अशी मागणी हिंदू महासभेने केली आहे.

सावरकरांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी मोठे योगदान दिलेले आहे. सावरकारांनी देशासाठी केलेल्या कार्याची दखल घेऊऩ त्यांना भारतीय चलनातील नोटेवर स्थान द्यायला हवे असे हिंदू महासभेने केंद्राला लिहलेल्या पत्रात म्हटले आहे. 

काल सावरकरांची १३५ वी जयंती देशभरात साजरी करण्यात आली. यानिमित्तानेच हिंदू महासभेने ही मागणी केली आहे. हिंदुत्व ही संकल्पना विनायक दामोदर सावरकर यांनी पुढे आणली. याचबरोबर हिंदू महासभेचे प्रमुख स्वामी चक्रपाणी यांनी सावरकरांचे कार्य लक्षात घेऊन त्यांना 'भारतरत्न' हा सर्वोच्च नागरी पुरस्कार देण्यात यावा अशी मागणीही केली आहे.

Web Title: Hindu Mahasabha Request Veer Savarkars Picture On Currency