अंजली म्हणाली, मी इब्राहिमवर प्रेम केलंय आम्हाला जगू द्या...

वृत्तसंस्था
गुरुवार, 24 ऑक्टोबर 2019

मला नरकामधून मुक्तता हवी आहे. मी माझ्या इब्राहिमवर प्रेम केले आहे. विवाहसुद्धा केला पण आमच्या विवाहावर धार्मिक मुद्दा उपस्थित करून दोघांना वेगळे करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असे युवतीने म्हटले आहे.

रायपूर (छत्तीसगड): मला नरकामधून मुक्तता हवी आहे. मी माझ्या इब्राहिमवर प्रेम केले आहे. विवाहसुद्धा केला पण आमच्या विवाहावर धार्मिक मुद्दा उपस्थित करून दोघांना वेगळे करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असे युवतीने म्हटले आहे.

छत्तीसगडमध्ये इब्राहिम व अंजलीच्या विवाहाचा मुद्दा चर्चेचा विषय बनला आहे.  दोघांच्या विवाहावरून राज्यात आंदोलने होत आहेत. विवाहाचा विषय न्यायालयामध्ये गेला. न्यायालयाने अंजली जैन हिला रायपूर येथील सरकारी निवासस्थानामध्ये ठेवले आहे.

अंजली म्हणाली, 'मला नरकामधून मुक्तता हवी आहे. मी माझ्या इब्राहिमवर प्रेम केले आहे. विवाहसुद्धा केला असून, इब्राहिमसोबत आयुष्यभर राहू इच्छिते. परंतु, आमच्या विवाहाला धार्मिक रंग देण्यात आला असून, आम्हाला वेगवेगळे करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मला मनाप्रमाणे जगू द्या. '

इब्राहिम औरअंजलि अंजलीचा विवाह हा 'लव्ह जिहाद' असल्याचे अंजलीचे वडील अशौक जैन म्हटले आहे. पोलिसांनी अंजलीला बंदूकीचा धाक दाखवून रायपूर येथील सरकारी निवासामध्ये ठेवले आहे. मला भेटू दिले जात नाही, असे अशौक जैन यांनी म्हटले आहे.

धमतरी येथील मोहम्मद इब्राहिम सिद्दिकी (वय 33) याने अंजली जैन सोबत 25 फेब्रुवारी 2018 मध्ये मंदिरामध्ये जाऊन विवाह केला आहे. इब्राहिमने म्हटले आहे की, 'अंजली सोबत विवाह करण्यापूर्वी मी हिंदू धर्म स्वीकारला असून, आता माझे नाव आर्यन आहे. आमच्या विवाहाबद्दल अंजलीच्या घरच्यांना समजल्यानंतर त्यांनी तिला घरामध्ये कोंडून ठेवले होते. तिच्याशी संपर्क साधण्याचा अनेकदा प्रयत्न केला पण यश आले नाही. अखेर छत्तीसगड उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली. न्यायायलाने निकालानंतर तिच्या वडिलांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. खूप काही झाले. अखेर तिची रवानगी सरकारी निवासस्थानामध्ये करण्यात आली आहे.'

दरम्यान, राज्यात दोघांच्या विवाहाचा विषय चर्चेचा ठरला असून, अनेकांनी दोघांना सुरक्षा देण्याची मागणी केली आहे.

प्रदर्शन

प्रदर्शन


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hindu Muslim Couple Fights to Live Together Amid Love Jihad Claims