हिंदुत्वनिष्ठ संघटना हिंदुराष्ट्र जागृतीचे उपक्रम देशभर राबवणार

अवित बगळे
गुरुवार, 7 जून 2018

पणजी : हिंदुराष्ट्र निर्मितीसाठी येत्या लोकसभेच्या निवडणुकीत हिंदुत्ववादी सरकार सत्तेवर येण्यासाठी शक्य ते सारे प्रयत्न करण्याच्या निर्णय हिंदुराष्ट्र स्थापनेसाठीच्या सातव्या अखिल भारतीय हिंदू अधिवेशनात करण्यात आला. या अधिवेशनाला 18 राज्यांसह नेपाळ, श्रीलंका आणि बांगलादेश येथील 175 हून अधिक हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे 375 हून अधिक प्रतिनिधी उपस्थित होते. हिंदूराष्ट्र स्थापनेसाठी देशभर जागृतीचे उपक्रम राबविण्याचेही ठरविण्यात आले. तीन दिवस चाललेल्या या अधिवेशनाचा आज समारोप झाला.

हिंदुराष्ट्र हा भारतातील बहुसंख्य हिंदूंचा नैसर्गिक अधिकार आहे, असा विचार या अधिवेशनात व्यक्त करण्यात आला. त्यासाठीची वैचारिक भूमिका आणि करावयाची कृती यांसंदर्भात दिशा देणारेे असे हे अधिवेशन होते.

बहुसंख्य हिंदुत्वनिष्ठांनीही संघटित होऊन राजकीय पक्षांच्या आश्‍वासनांवर विश्‍वास न ठेवता, राजकीय पक्षांसमोर आपल्या मागण्या ठेवणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने देशभरातील हिंदूंच्या समस्यांचा अभ्यास करून हिंदूंचे ‘निवडणूक मागणीपत्र’ बनवण्यात येणार आहे. त्यात हिंदु राष्ट्राची मागणी प्रमुख असणार आहे, अशी माहिती हिंदू जनजागृती समितीचे प्रवक्ते रमेश शिंदे यांनी दिली.

हिंदु जनजागृती समितीचे  मार्गदर्शक डॉ.चारुदत्त पिंगळे यांनी सांगितले, की  हिंदु राष्ट्र-स्थापनेविषयी समाजात जागृती आणण्यासाठी समानसूत्री कार्यक्रमाच्या अंतर्गत ‘हिंदु राष्ट्र जागृती सभा’, ‘ग्रामस्तरीय हिंदु राष्ट्र-जागृती बैठका’, ‘हिंदु राष्ट्र परिसंवाद’, ‘हिंदु राष्ट्र संपर्क अभियान’, ‘ 2019 च्या प्रयाग कुंभमेळ्यात हिंदु राष्ट्रजागृती आणि संतसंघटन’ आदी विविध उपक्रम या येत्या वर्षभरात राबवण्यात येणार आहेत.

Web Title: hindu unions spread works for awareness of hindu rashtra