हिराखंड एक्‍स्प्रेस दुर्घटनेची एनआयएमार्फत चौकशी करा

पीटीआय
गुरुवार, 26 जानेवारी 2017

रेल्वेमंत्र्यांचे राजनाथसिंह यांना पत्र

नवी दिल्ली : हिराखंड एक्‍स्प्रेसला झालेल्या अपघाताची राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या माध्यमातून चौकशी करण्याची मागणी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांच्याकडे केली आहे. याबाबत त्यांनी राजनाथसिंह यांना एक पत्रही लिहिले आहे. आपल्या 23 जानेवारीला लिहिलेल्या पत्रात प्रभू यांनी हिराखंडच्या अपघाताची राष्ट्रीय तपास यंत्रणेमार्फत तपासाची मागणी करीत बाह्यघटकांद्वारा या अपघाताबाबतच्या सहा शक्‍यतांची यादीही दिली आहे.

आंध्र प्रदेशातील कुनेरू स्थानकाजवळ हिराखंड एक्‍स्प्रेसच्या अपघाताचा उल्लेख त्यांनी या पत्रात केला आहे. त्याशिवाय या महिन्याच्या सुरवातीला कोरपुट क्रिनदुल स्थानकादरम्यान दोन मालगाड्यांचा अपघात आणि एक जानेवारी रोजी रेल्वे रुळाजवळ मिळालेल्या कुकर बॉंबचा उल्लेख रेल्वेमंत्र्यांनी आपल्या पत्रात केला आहे.

इंदूर पाटणा एक्‍स्प्रेस कानपूरजवळ घसरल्याने 150 जण मरण पावले होते. ते म्हणाले, रुळांचे नुकसान करून रेल्वे अपघात घडवून आणणाऱ्या काही जणांचा बिहार पोलिसांनी शोध लावला आहे. त्यामुळे कानपूरजवळ झालेल्या अपघाताची माहिती कळू शकेल. या प्रकारच्या दुर्घटना टाळण्यासाठी सर्वांनी जागरूक राहून देशविरोधी कृत्य करणाऱ्यांचा पर्दाफाश करावा, असे आवाहन प्रभू यांनी ट्‌विटरद्वारे केले आहे. त्याशिवाय रेल्वे कर्मचाऱ्यांना आणि पोलिसांना सतर्क राहण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. त्याशिवाय देशविरोधी कृत्यासंबंधीची माहिती नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

Web Title: hirakhand express accident nim enquiry