हे ऐतिहासिक पाऊल - नरेंद्र मोदी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 9 नोव्हेंबर 2016

नवी दिल्ली - भ्रष्टाचार, काळा पैसा आणि दहशतवादाविरुद्ध लढा देण्यासाठी हे ऐतिहासिक पाऊल असल्याचे म्हणत या निर्णयाचे स्वागत केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आभार व्यक्त केले आहेत.

नवी दिल्ली - भ्रष्टाचार, काळा पैसा आणि दहशतवादाविरुद्ध लढा देण्यासाठी हे ऐतिहासिक पाऊल असल्याचे म्हणत या निर्णयाचे स्वागत केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आभार व्यक्त केले आहेत.

मंगळवारी रात्री अचानक एका कार्यक्रमात बोलताना मोदी यांनी चलनात असलेल्या पाचशे आणि हजारच्या नोटा बंद करण्यात आल्याची घोषणा केली. त्यानंतर देशभरातून त्यांच्या निर्णयाचे स्वागत करण्यात आले. आज ट्विटरद्वारे प्रतिक्रिया व्यक्त करताना मोदी यांनी म्हटले आहे की, "भ्रष्टाचार, काळा पैसा आणि दहशतवादाविरुद्धचे हे ऐतिहासिक पाऊल आहे. सर्वांचे आभार. आपण सर्वांनी समृद्ध, सर्वसमावेशक आणि भ्रष्टाचारमुक्त भारतासाठी खांद्याला खांदा लावून काम करणे आवश्‍यक आहे.'

यांनी केले निर्णयाचे स्वागत

  • अर्थक्रांती आणल्याबद्दल मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन करतो. - श्रीश्रीश्री रवी शंकर
  • काळा पैसा, काळा व्यवहार, भ्रष्टाचार आणि बनावट नोटांवर नियंत्रण मिळविण्यासाठी दिशेने मोदी सरकार यांनी एक ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. खूप खूप शुभेच्छा. - स्वामी रामदेव
  • काळ्या पैशात मानवी तस्करी आणि बालकामगारांसंदर्भातील गुन्ह्यांचा मोठा सहभाग आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या धाडसी पावलाबद्दल अभिनंदन - कैलाश सत्यार्थी
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जबरदस्त चेंडू टाकला आहे. छान सर! आम्हाला तुमचा अभिमान आहे - अनिल कुंबळे
  • काळ्या पैशावर नियंत्रण मिळवून आपली अर्थव्यवस्था बळकट होण्यासाठी 500 आणि 1000 रुपयांच्या नोटांवर बंदी आणल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन - मधुर भांडारकर
  • नरेंद्र मोदीजी सलाम! नव्या भारताचा जन्म झाला आहे. जय हिंद! - रजनीकांत
Web Title: A historic step to fight corruption, black money and terrorism - Modi