देशातील ऐतिहासिक पदयात्रा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

historical yatra in country Congress leader Rahul Gandhi Bharat Jodo Yatra

देशातील ऐतिहासिक पदयात्रा

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला बुधवारपासून प्रारंभ झाला आहे. भारतात अगदी स्वातंत्र्यपूर्वकाळापासून आतापर्यंत अनेक पदयात्रा काढण्यात आल्या आहेत. देशाच्या राजकारणाला कलाटणी देणाऱ्या ठरलेल्या पाच यात्रांना ऐतिहासिक महत्त्व आहे.

दांडी यात्रा

कालावधी : १२ मार्च १९३० नेतृत्व : महात्मा गांधी

मार्ग : साबरमती ते दांडी अंतर : ३,५०० किमी

कारण : मीठावरील कर रद्द करण्याबरोबरच प्रत्येक कुटुंबाला स्वातंत्र्य लढ्यात सहभागी करून घेणे

यात्रेचे फलित : १) ‘बाँबे सॉल्ट ॲक्ट’मधील कलम ३९ रद्द. मीठ तयार करणाऱ्या आरोपींच्या घरी घुसून झडती घेण्याचा अधिकार या कलमाद्वारे दिला होता.

२) मीठ तयार केल्यास सहा महिने तुरुंगवास आणि मोठ्या दंडाची शिक्षा रद्द

३) या यात्रेद्वारे राजकीय कारणांसाठी हा पर्याय उपलब्ध झाला.

चैतन्य रथम यात्रा

कालावधी : २९ मार्च १९८२ पासून नेतृत्व : एन.टी. रामाराव

मार्ग : हैदराबादहून संपूर्ण आंध्र प्रदेश अंतर : ७५० किमी

कारण : तेलुगू सुपरस्टार एन.टी.रामाराव यांचा राजकारणात प्रवेश

फलित : यात्रेनंतर नऊ महिन्यांनी झालेल्या निवडणुकीनंतर रामाराव यांचा तेलुगू देसम पक्ष आंध्रात सत्तेवर आला.

रथयात्रा

कालावधी : २५ सप्टेंबर १९९० पासून नेतृत्व : लालकृष्ण अडवानी

मार्ग : गुजरातमधील सोमनाथ मंदिरापासून नऊ राज्यांमधून प्रवास

अंतर : दहा हजार किमी

कारण : व्ही.पी. सिंह यांच्या सरकारने मंडल आयोगाद्वारे मागास जातींना नोकरीत आरक्षणाची निर्णय घेतला होता. या वर्गाला भाजपबरोबर जोडण्याचा हेतू. या रथयात्रेद्वारे पक्षाने राम मंदिर उभारण्यासाठी प्रचार मोहिमेला गती दिली.

फलित : १) व्ही. पी. सिंह यांनी ही रथयात्रेवर टीका केल्यानंतर त्यांच्या नेतृत्वाखालील केंद्रातील सरकारचा पाठिंबा काढल्याने ते कोसळले.

२) भाजप देशातील दुसरा मोठा पक्ष बनला

३) १९९१मधील लोकसभा निवडणुकीत भाजपने पूर्वीपेक्षा ३५ जागा जास्त मिळवत १२०चा आकडा गाठला.

आंध्र प्रदेश पदयात्रा

कालावधी : २००४ नेतृत्व : वाय.एस. राजशेखर रेड्डी

मार्ग : चेवेल्ला शहरापासून ११ जिल्ह्यांमध्ये अंतर : १,५०० किमी

कारण : दुष्काळी समस्येवर तेलुगू देशम पक्षाच्या सरकारचे लक्ष वेधणे

फलित : या यात्रेत रेड्डी यांना जनतेचे समर्थन मिळाले. २००४मधील विधानसभा निवडणुकीत त्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे सरकार सत्तेवर आले.

प्रजा संकल्प यात्रा

कालावधी : ६ नोव्हेंबर २०१७ नेतृत्व : जगनमोहन रेड्डी

मार्ग : आंध्र प्रदेशमधील कडप्पा जिल्ह्यापासून १३ जिल्ह्यांमधून

अंतर : ३, ६४८ किमी

कारण : काँग्रेस व ‘टीडीपी’च्या सरकारच्या कारभाराला कंटाळलेल्या जनतेला एक संधी देण्याचे आवाहन

फलित : २०१९ मधील लोकसभा निवडणुकीत जागा वाढल्या तर विधानसभा निवडणुकीत विजय होऊन त्यांच्या वायएसआर काँग्रेस पक्षाचे सरकार सत्तेवर आले.

Web Title: Historical Yatra In Country Congress Leader Rahul Gandhi Bharat Jodo Yatra

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..