देशात हिटलरगिरीचे वातावरण : अबू आझमी

वृत्तसंस्था
शनिवार, 3 डिसेंबर 2016

मुंबई - पश्‍चिम बंगालमध्ये लष्कराला तैनात करण्याच्या मुद्यावरून पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना समाजवादी पक्षाने पाठिंबा दर्शविला असून देशात हुकूमशाहीचे आणि हिटलरगिरीचे वातावरण निर्माण झाले असल्याचा आरोप समाजावादी पक्षाने केला आहे.

समाजवादी पक्षाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष अबू आझमी वृत्तसंस्थेशी बोलताना म्हणाले, "केंद्र सरकार इतरांवर लक्ष ठेवून आहे. देशामध्ये हुकूमशाही आणि हिटलरगिरीचे वातावरण निर्माण झाले आहे. संपूर्ण देशात मोठ्या प्रमाणात अनागोंदी कारभार सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारतीय जनता पक्षालाही न विचारता स्वत:च निर्णय घेत आहेत.' तसेच 'ममता बॅनर्जी जे काही म्हणत आहेत ते अगदी खरे आहे. लोकशाहीमध्ये सरकार दुसऱ्यांचे ऐकून घेते आणि संसद अंतिम निर्णय घेते. बॅनर्जी यांचा राग योग्य आहे', असे आझमी पुढे म्हणाले.

पश्‍चिम बंगालमध्ये टोल नाक्‍यांसह विविध ठिकाणी लष्कराचे जवान तैनात करण्यात आल्याच्या पार्श्‍वभूमीवर "पश्‍चिम बंगालमध्ये लष्‌कराच्या मदतीने सरकार उलथविण्याचा प्रयत्न तर होत नाही ना?', असे म्हणत बॅनर्जी यांनी केंद्रावर आरोप केला आहे. तर संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी त्याबाबतचे स्पष्टीकरण देताना संबंधित राज्यातील पोलिसांना विश्‍वासात घेऊनच लष्कराला तैनात केले असून ईशान्येकडील राज्यांमध्ये गेल्या 15 ते 20 वर्षांपासून अशा पद्धतीने काही कालावधीसाठी लष्कराचे जवान तैनात केले जात असल्याचे सांगितले आहे.

Web Title: Hitlargiri in country : Abu Azami