NIAची मोठी कारवाई! कट्टरतावाद्यांचं मोड्युल उद्ध्वस्त; डार्क वेबचा वापर, ओळख लपवून कारवाया : HuT Case | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

NIA

HuT Case: NIAची मोठी कारवाई! कट्टरतावाद्यांचं मोड्युल उद्ध्वस्त; डार्क वेबचा वापर, ओळख लपवून कारवाया

भोपाळ : धार्मिक कट्टरतावाद पसरवणाऱ्या हिज्ब-उत-तहरीर या संघटनेच्या १६ सदस्यांना भोपाळ, छिंदवाडा आणि हैदराबादमधून अटक करण्यात आली आहे. राष्ट्रीय तपास पथकानं अर्थात NIAनं या ठिकाणांवर अचानक केलेल्या छापेमारीनंतर यांना ताब्यात घेण्यात आलं. गेल्या मंगळवारी ही कारवाई करण्यात आली. याची चौकशी NIAकडून सुरु करण्यात आली आहे. या कारवाईनंतर प्राथमिक चौकशीतून अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत. (Hizb ut Tahrir Madhya Pradesh Hyderabad Terrorism Radicals module destroyed by NIA)

एनआयएनं आणि तेलंगाणाच्या एटीएसनं ही कारवाई केली होती. या टीमनं भोपाळमध्ये जेव्हा छापेमारी करत या कट्टरवाद्यांना अटक केली तेव्हा याची खबर भोपाळ पोलिसांनाही नव्हती. इतक्या गुप्तपणे ही कारवाई करण्यात आली. यामध्ये आत्तापर्यंत एकूण १६ जणांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये भोपाळमधून १०, हैदराबादमधून ५ तर छिंदवाडा इथून एका जणाला ताब्यात घेण्यात आलं आहे. याद्वारे धार्मिक कट्टरता पसरवणारं हे मोड्युलच उद्ध्वस्त करण्यात आलं आहे.

याची चौकशी मध्य प्रदेश एटीएस आणि आयबीकडून करण्यात येत होती. पण हे प्रकरण आंतरराज्यीय असून याचे कनेक्शन आंतरराष्ट्रीय स्तरावर आहेत. त्यामुळं आता याचा तपास एनआयएनं ताब्यात घेतला आहे. अटक करण्यात आलेल्या लोकांचा पाकिस्तानातील एका फोन नंबरच्या सतत संपर्कात असल्याचंही प्राथमिक तपासात समोर आलं आहे.

अनेक धक्कादायक खुलासे

एनआयएनं या प्रकरणाचा तपास सुरु केल्यानंतर यामध्ये अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत. त्यानुसार, कट्टरवादी विचार पसरवण्यासाठी हे लोक हिज्ब-उत-तहरीर या संघटनेचं केडर निर्माण करण्याच्या प्रयत्नात होते. त्यासाठी ते आपली ओळख लपवून वावरत होते. त्यासाठी एखाद्या गुप्तहेराप्रमाणं ते जीम ट्रेनर, कॉम्प्युटर टेक्निशिन, टेलर आणि रिक्षा ड्रायव्हर बनून वावरत होते.

कारवायांसाठी डार्क वेबचा वापर

यातील सर्वात मोठा खुलासा म्हणजे कट्टरतावाद पसरवणारे हे लोक संवादासाठी डार्क वेब अॅप रॉकेट चॅट आणि थ्रिमा सारख्या अॅप्सचा वापर करत होते. यामुळं ते नक्की कुठल्या ठिकाणावरुन संवाद साधत आहेत हे तपास यंत्रणांना कळू शकत नाही. त्याचबरोबर कारवायांसाठी त्यांना जंगलात शस्त्र चालवण्याचं प्रशिक्षण दिलं जात होतं. अटक झालेल्यांपैकी पाच जणांनी हिंदू मुलींशी लग्न केलं होतं, असाही खुलासा एनआयएच्या चौकशीतून झाला आहे.

टॅग्स :Desh newsTerrorismNIA