जम्मू-काश्मीरमध्ये ठिकठिकाणी दगडफेक; इंटरनेटवर बंदी

वृत्तसंस्था
शनिवार, 27 मे 2017

श्रीनगरः जम्मू-काश्‍मिरमध्ये लष्करासोबत झालेल्या चकमकीत हिज्बुल मुजाहिद्दीनचा दहशतवादी व बुरहाण वाणीचा उत्तराधिकारी सबझर अहमद ठार झाल्यानंतर ठिकठिकाणी दगडफेक सुरू झाली असून, सरकराने इंटरनेवर आज (शुक्रवार) बंदी घातली आहे.

श्रीनगरः जम्मू-काश्‍मिरमध्ये लष्करासोबत झालेल्या चकमकीत हिज्बुल मुजाहिद्दीनचा दहशतवादी व बुरहाण वाणीचा उत्तराधिकारी सबझर अहमद ठार झाल्यानंतर ठिकठिकाणी दगडफेक सुरू झाली असून, सरकराने इंटरनेवर आज (शुक्रवार) बंदी घातली आहे.

जम्मू-काश्‍मिरमध्ये फेसबुक, व्हॉटसऍप आणि ट्विटरसह अन्य काही सोशल नेटवर्किंग साईटसवर असलेली बंदी शुक्रवारी सकाळी हटविण्यात आली होती. परंतु, सबझर अहमद ठार झाल्यानंतर ठिकठिकाणी दगडफेकीला सुरवात झाली. यामुळे सरकारने काही तासांतच इंटरनेटवर बंदी घातली. सरकारने इंटरनेट बंद करण्यामागचे कारण व किती काळासाठी असणार याबाबतची कोणतीही माहिती दिलेली नाही. विविध भागांमध्ये दगडफेक होऊ लागली होती. फेसबुक, व्हॉट्सऍपवरून चिथावणी होऊन परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून इंटरनेटवर बंदी घालण्यात आली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

गेल्या काही महिन्यांपासून काश्‍मिरमध्ये असलेल्या अशांत परिस्थितीमुळे सोशल मिडियावर बंदी आणली होती. काही देशविरोधी घटकांकडून सोशल मिडियाचा गैरवापर करून कायदा आणि सुव्यवस्थेला बाधा पोचविण्यात आल्याने काश्‍मिरमध्ये सोशल मिडियावर बंदी आणली होती. आज सकाळीच ती उठविण्यात आली होती. परंतु, काही तासांमध्येच पुन्हा इंटरनेटवर बंदी घालण्यात आली.

दरम्यान, लष्कराला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार लष्कराच्या 42 राष्ट्रीय रायफल्सच्या तुकडीने त्राल सेक्‍टरमधील सैमु गावात पोलिसांसोबत संयुक्त कारवाई करत दहशतवादी सबझर अहमदच्या घराला घेराव घातला. यावळी झालेल्या चकमकीत सबझर अहमद ठार झाला. अहमद हा त्राल येथील रात्सोना गावातील रहिवासी होता. बुरहाण वाणी ठार झाल्यानंतर हिज्बुल मुजाहिद्दीनमार्फत त्याने भारतविरोधी कारवाया करण्यास सुरूवात केली होती.

ताज्या बातम्याः

Web Title: Hizbul terrorist killing: Stone-pelting protests, govt shuts internet services