
Holi 2023 : अशीही एक होळी, 'या' गावात होळीच्या दिवशी दगड फेकून मारले जातात...
Holi 2023 : होळी म्हणजे रंगांची उधळण आणि रंगपंचमीचा उत्साह. देशाच्या विविध भागांत होळी वेगवेगळ्या पद्धतीने साजरी केली जाते. काही ठिकाणी होळी रंगांची उधळण करून साजरी केली जाते तर काही ठिकाणी होळी ही वेगळ्या पद्धतीने साजरी केली जाते. भारतात असे एक गाव आहे जिथे होळी साजरी करण्याची अनोखी पद्धत आहे. चक्क दगडफेक करून येथे होळी खेळली जाते. चला तर जाणून घेऊया या गावाबाबत सविस्तर.
इथे होळीच्या दिवशी शेतात लाकडी खुंटा रोवला जातो. परंपरेनुसार गावातील नागरिक शेतात पुरलेला हा लाकडी खुंटा उपटण्याचा प्रयत्न करतात आणि या वेळी शेतात जमलेला जमाव त्यांना दगड आणि शेतातील मातीची ढेकळे फेकून मारतो. वरून दगड आणि ढेकळांचा पाऊस सुरु असतानाच जो कोणी जमिनीत रोवलेला हा खुंटा उपसण्यात यशस्वी होतो त्याला भाग्यवान मानले जाते.
होळीला आपण राक्षसी होलिकाची पूजा का करतो?
हिरण्यकश्यप राक्षसी पुत्र होता. त्याने तपश्चर्या करून ब्रह्माकडून वरदान मिळवलेले होते. हिरण्यकश्यपने जेव्हा पृथ्वीला पटली नेण्याचा प्रयत्न केला तेव्हा विष्णूने वराह अवतार धारण करुन त्याचा नाश केला. त्यामुळे भडकलेल्या हिरण्यकश्यपने विष्णूचे आपल्या राज्यात कोणी नाव घेऊ नये असे सगळ्यांना बजावले. हिरण्यकश्यप स्वत:ला श्रेष्ठ समजत असे आणि देवतांविषयी त्याला अतिशय तिरस्कार होता.
पण त्याच्याच घराण्यात जन्माला आलेल्या त्याचा मुलगा प्रल्हाद हाच मोठा विष्णुभक्त निघाला. प्रल्हाद बालपणापासून विष्णूचा (नारायणाचा) परमभक्त होता. प्रल्हाद दिवस-रात्र भगवान विष्णूंच्या नावाचे नामस्मरण करीत असे. नेमके हेच हिरण्यकश्यपला मान्य नव्हते. त्यामुळे त्याने प्रल्हादाला त्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. परंतु, प्रत्येकावेळी तो अयशस्वी ठरला.
सगळे उपाय करुन थकलेल्या हिरण्यकश्यपला त्याची बहीण जिचे नाव होलिका होते ती म्हणाली "दादा, मला तुझा त्रास बघवत नाही. मला अग्नी देवाकडून असं वरदान आहे की मला आग जाळू शकत नाही. मी प्रल्हादला अग्नीत घेऊन बसते. मला वरदान असल्यामुळे मी जळणार नाही पण तो जाळून खाक होईल. (Village)
हे ऐकून हिरण्यकश्यपने गवत आणि वाळलेल्या लाकडाची मोठी पेढी तयार केली. त्यात होलिका प्रल्हादला घेऊन बसली आणि शिपायांनी आग लावली. होलिका आपल्याच वरदानाच्या धुंधीत होती. पण, प्रल्हादाच्या भक्तिसाधनेमुळे उलटेच घडले. (Holi)
होलिकेचे अंग जाळू लागले. तिच्या अंगाचा दाह होऊ लागला. प्रल्हाद मात्र विष्णूच्या नामस्मरणात दंग होता. शेवटी जे व्हायचे तेच झाले. होलिका जाळून खाक झाली नि प्रल्हाद सुखरूप जिवंत राहिला. त्याच्या भक्तीने प्रसन्न होऊन विष्णूने खांबातून नृसिंह अवतार घेऊन हिरण्यकश्यपचा वध केला. तेव्हापासून होळी जाळण्याची परंपरा सुरू झाली.