काश्मीरबाबत गृहमंत्र्यांची गुप्तचर यंत्रणांच्या प्रमुखांशी चर्चा 

Amit Shah
Amit Shah

नवी दिल्ली : काश्‍मीरमध्ये "बडा कुछ होने वाला है'च्या रंगलेच्या चर्चेच्या पार्श्‍वभूमीवर गृहमंत्री अमित शहा यांनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार तसेच गुप्तचर यंत्रणांच्या प्रमुखांना बोलावून राज्यातील परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच, केंद्रीय मंत्रिमंडळाची आज (ता. 5) सकाळी बैठक होणार असल्याने त्याबद्दलही कयास लढवले जात आहेत. 

काश्‍मीरमधील दहशतवादी हल्ल्याची शक्‍यता पाहता अमरनाथ यात्रा तडकाफडकी रद्द करण्यात आली असून, सर्व यात्रेकरूंना तसेच पर्यटकांनाही शक्‍य तेवढ्या लवकर काश्‍मीर सोडून जाण्यास सांगितले आहे. या पार्श्‍वभूमीवर गृहमंत्री अमित शहा यांनी आज घेतलेली उच्चस्तरीय बैठक काश्‍मीरशी संबंधित असल्याचे सांगितले जात आहे. संसद भवनाच्या परिसरात झालेली बैठक दोन तास चालली राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल, गृहसचिव राजीव गौबा, रॉ प्रमुख सामंत गोयल, आयबी प्रमुख अरविंद कुमार हजर होते. यानंतर जम्मू-काश्‍मीर विभागाचे अतिरिक्त सचिव ज्ञानेश कुमारही गृहमंत्र्यांना भेटले. यासोबतच शहा यांनी दोनदिवसीय काश्‍मीर दौऱ्याचे नियोजन केल्याचे सरकारतर्फे सांगण्यात आले. संसद अधिवेशन संपल्यानंतर लगेच ते जातील. बुधवारी (ता. 7) अधिवेशन समाप्ती असल्याने आठ ते दहा ऑगस्ट हा गृहमंत्र्यांचा दौरा कालावधी असू शकतो, असे सरकारच्या सूत्रांनी सांगितले. 

दुसरीकडे, आज सकाळी साडेनऊला केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. त्याचबरोबर काश्‍मीरमध्ये आर्थिक आधारावर 10 टक्के आरक्षण लागू करण्यासाठीचे "जम्मू-काश्‍मीर (द्वितीय दुरुस्ती) आरक्षण विधेयक' आज सरकार संसदेपुढे आणणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com